PM Suraksha Bima Yojana: सरकारची भन्नाट योजना! वर्षाला फक्त १२ रूपये भरा, अन् लाखोंची मदत मिळवा

Sarkari Yojana: केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. यामध्ये विविध प्रकारच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
Sarkari Yojana
Sarkari YojanaSaam Tv
Published On

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Benefits

सरकार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या हिताची काळजी घेते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक लाभ देण्यासाठी काही योजना चालवल्या जातात, अशीच एक योजना केंद्र सरकार राबवत आहे. या योजनेचं नाव प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना (Sarkari Yojana) आहे. या योजनेअंतर्गत लोकांचा विमा उतरवला जातो. (latest sarkari yojana)

प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना या विमा योजनेचा (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) प्रीमियम खूपच कमी आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकजण अर्ज करत आहेत. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात, ते आपण पाहू या.

प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना काय आहे?

प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना ही एक अपघात विमा योजना आहे. या योजनेची सुरुवात 2015 साली झाली होती. सामान्यतः, जेव्हा कोणी अपघाती विमा घेतो तेव्हा त्याचे प्रीमियम शुल्क खूप जास्त (PM Suraksha Bima Yojana) असते. पण पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत वर्षाला फक्त ₹ 12 जमा करावे लागतात. या योजनेअंतर्गत, कोणत्याही प्रकारच्या अपघातामुळे मृत्यू झाल्यास, नामांकित व्यक्तीला 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक रक्कम दिली जाते.

तर गंभीर दुखापत किंवा अपंगत्व असल्यास, ₹ 100,000 ची रक्कम प्रदान केली (Insurance Scheme) जाते. या विम्याचा कालावधी 1 वर्षाचा आहे. दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. त्याचा वार्षिक प्रीमियम 1 जूनपूर्वी खात्यातून कापला जातो.

Sarkari Yojana
Cancer Insurance Policy: एलआयसी कॅन्सर कव्हर प्लॅन! आजच खरेदी करा आणि उपचारासाठी मदत मिळवा

कोण लाभ घेऊ शकतो ?

गरीब आणि मागासवर्गीय लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही विमा योजना सुरू करण्यात आली आहे. गरीब आणि मागासवर्गीय लोकांना कमी खर्चात विमा संरक्षण योजनेचा लाभ मिळवून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणं आवश्यक (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Benefits) आहे. यासोबतच तो मागासवर्गीय किंवा गरीब वर्गातील असेल, तरच यासाठी अर्ज करू शकतो.

या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे (Investment Scheme) वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे. ज्या बँकेत ऑटो डेबिट सुविधा सक्रिय आहे, त्याच बँकेत खाते देखील असावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन फॉर्म भरून सबमिट करता येतो. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊनही ऑनलाइन अर्ज करता येतो.

Sarkari Yojana
Debit Card Insurance : एटीएम कार्डवर मिळतो १ कोटीपर्यंतचा विमा, जाणून घ्या कसा दावा करायचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com