Debit Card Insurance : एटीएम कार्डवर मिळतो १ कोटीपर्यंतचा विमा, जाणून घ्या कसा दावा करायचा

Accidental Insurance on Debit Card: विम्यासाठी तुम्हाला नियमित हजारो रुपयांचा प्रिमियम भरावा लागतो. तेव्हाच तुम्हाला विम्याचा लाभ मिळतो. मात्र, तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला मोफत विमा मिळू शकतो. जाणून घेऊया सविस्तर माहिती
Debit Card Secret Tips
Debit Card Secret Tips Saam tv
Published On

Debit Card Offers Free Insurancee:

सध्या बहुतांश लोक विम्यावर हजारो रुपये खर्च करतात. विम्यामुळे व्यक्तीला आर्थिक सुरक्षा मिळते. या विम्यासाठी तुम्हाला नियमित हजारो रुपयांचा प्रिमियम भरावा लागतो. तेव्हाच तुम्हाला विम्याचा लाभ मिळतो. मात्र, तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला मोफत विमा मिळू शकतो. जाणून घेऊया सविस्तर माहिती (Latest Marathi News)

काही डेबिट कार्डवर तीन कोटींचा मोफत अपघात विमा मिळतो. या डेबिट कार्डधारकांना कोणत्याही प्रकारचा प्रिमियम घेतला जात नाही. तसेच बँकेकडूनही विम्यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे मागितले जात नाहीत.

डेबिट कार्डवर मोफत अपघात विमा संरक्षणासाठी काही अटी आणि नियम लागू आहेत. यातील महत्वपूर्ण बाब अशी की, कार्डधारकांना एका निश्चित काळात काही ट्रांजेक्शन असणे गरजेचे असते. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Debit Card Secret Tips
Business Idea In Marathi: अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलात सुरु करा व्यवसाय; होईल तगडी कमाई, जाणून घ्या

१ कोटींचा अपघाती विमा

मोफत अपघात विम्यावर दावा करण्यासाठी विविध बँकेत वेगवेगळे नियम आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर, मिलेनिया डेबिट कार्डवर डोमेस्टिक यात्रेसाठी ५ लाख आणि आंतरराष्ट्रीय हवाई यात्रेसाठी १ कोटी रुपयांचा अपघाती विमा मिळतो. हा विमा अॅक्टिव्हेट करण्यासाठी कार्ड धारकांना ३० दिवसांत कमीत कमी एकदा ट्रांजेक्शन असणे गरजेचे आहे.

Debit Card Secret Tips
Rural Business Idea In Marathi: गावात सुरु करा हटके व्यवसाय; दिवसाला कराल हजारो रुपयांची कमाई, जाणून घ्या भन्नाट आयडिया

प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम

कोटक महिंद्रा बँकेच्या अपघात विम्यावर दावा करण्यासाठी डेबिट कार्डधारकांकडून मागील ३० दिवसांत कमीत कमी ५०० रुपयांचं ट्रांजेक्शन असणे गरजेचे आहे. तसेच डीबीएस बँकेच्या इन्फिनिटी डेबिट कार्डधारकांना अपघात विमा अॅक्टिव्हेट राहण्यासाठी मागील ९० दिवसांत एक ट्रांजेक्शन असणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर डीबीएस बँकेच्या इन्फिनिटी डेबिट कार्डधारकाने यूपीआय आयडीच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण केली असेल तरी विम्याच्या दाव्यासाठी पात्र ठरणार नाही. दरम्यान, पॉइंट ऑफ सेल ट्रांजेक्शन किंवा ई-कॉमर्स ऑनलाइन ट्रांजेक्शनच्या आधारे विम्यावर दावा करता येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com