Post Office Time Deposit Scheme google
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दर तीन महिन्याला मिळणार ₹६१५००; कॅल्क्युलेशन वाचा

Post Office SCSS scheme: पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्ही दर तीन महिन्याला फक्त व्याजातून ६१,५०० रुपये कमवू शकतात.

Siddhi Hande

पोस्टाची जबरदस्त योजना

तीन महिन्याला मिळणार ६१,५०० रुपये

एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर कमाई करा

भविष्याच्या दृष्टीने आतापासून आर्थिक बचत करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही आताच पैशांची बचत केली नाही तर तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ शकतात. म्हातारपणात दर महिन्याला पैसे मिळावे, यासाठी आताच काही योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. यासाठी अनेक सरकारी योजना आहे.

पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तुम्हाला दर तीन महिन्याला ६१,५०० रुपये मिळतील. महिन्याला २०,५०० रुपये मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये तुम्हाला रेग्युलर इनकम मिळते. तुम्हाला तिमाही आधारावर ६१५०० रुपये मिळणार आहेत. अनेकजण खूप मोठी रक्कम गुंतवण्याआधी विचार करतात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर पैसे तर बुडणार नाहीत ना अशी चिंता असते. परंतु या योजनेतील गुंतवणूक सुरक्षित आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर सरकार स्वतः गॅरंटी देते. याचसोबत चांगले व्याजदरदेखील मिळते.

पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये चांगले व्याजदर मिळते. सध्या या योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळत आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. त्यामुळे तुम्हाला पाच वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. यात तुम्ही अजून तीन वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात.

पोस्टाच्या या योजनेत तुम्ही फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात.

या योजनेत तुम्ही सिंगल अकाउंटमध्ये १५ लाख तर जॉइंट अकाउंटमध्ये ३० लाख रुपये गुंतवू शकतात. जर तुम्ही ३० लाख गुंतवले तर त्यावर ८.२ टक्के व्याजदर मिळेल. पाच वर्षांसाठी हे व्याजदर दिले जाते. त्यानुसार तुम्हाला पाच वर्षात २.४६ लाख व्याज मिळणार आहे. तिमाही आधारावर ६१,५०० रुपये मिळणार आहे. महिन्याला २०,५०० रुपये व्याज मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT