Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Jennifer Winget Marriage: अभिनेत्री जेनिफर विंगेटने विल्यम इश्माएलसोबत ख्रिश्चन पद्धतीने दुसरे लग्न केल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर लग्नाचे खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी.
Jennifer Winget Marriage
Jennifer Winget MarriageSaam Tv
Published On

Jennifer Winget Marriage: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर जेनिफरने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे. अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड विल्यम इश्माएल याच्यासोबत लग्न केल्याची घोषणा केली आहे.

शनिवारी जेनिफरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. ख्रिश्चन पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात जेनिफर पांढऱ्या रंगाच्या ब्रायडल गाउनमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. तर विल्यम इश्माएल निळ्या रंगाच्या सूटमध्ये स्मार्ट दिसत होता. या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Jennifer Winget Marriage
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; प्रशांत दामलेंचा 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

पोस्टमधील एका फोटोमध्ये जेनिफर आणि विल्यम हातात हात घालून उभे असल्याचे दिसते. यावेळी जेनिफर तिच्या लग्नाची अंगठीही अभिमानाने दाखवत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये हे कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे. या रोमँटिक फोटोंसोबत जेनिफरने विल्यमला टॅग करत, 'And finally, our stars aligned' (अखेर आमचे नशीब एकत्र आले) असे कॅप्शन दिले.

Jennifer Winget Marriage
Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीच्या डोहाळ्यांसाठी अर्जुनची धावपळ; पण एका चुकीमुळे बाळावर ओढावणार मोठं संकट?

याशिवाय एका व्हिडिओ पोस्टमध्ये तिने चाहत्यांना आपल्या पतीची ओळख करून देताना, 'आमचे लग्न झाले आहे. देवियो और सज्जनों... मी तुम्हा सर्वांना माझ्या पतीची ओळख करून देत आहे,' असे लिहिले. तिची ही पोस्ट समोर येताच चाहते आणि अनेक सेलिब्रिटींनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दरम्यान, जेनिफर विंगेटचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिने २०१२ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हर याच्यासोबत विवाह केला होता. मात्र, दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर जेनिफरने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आणि अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com