Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

Sakshi Sunil Jadhav

सकाळचा नाश्ता

जर तुम्हाला रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल, तर मका आणि रव्यापासून बनवलेले आप्पे हा उत्तम पर्याय आहे.

Rava Appe

साहित्य

आप्पे बनवण्यासाठी रवा, उकडलेले मक्याचे दाणे, दही, पाणी, बारीक चिरलेला कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, मोहरी, कढीपत्ता, इनो किंवा बेकिंग सोडा, मीठ, तेल हे साहित्य लागणार आहे.

Rava Appe

कृती

एका मोठ्या भांड्यात रवा आणि दही घ्या. चांगले मिसळा. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ (इडलीच्या पिठासारखे) तयार करा. पीठ झाकून १५ मिनिटे तसेच ठेवा जेणेकरून रवा फुगेल.

Healthy Breakfast

भाज्या स्वच्छ करून चिरा

त्यानंतर मिश्रण घट्ट झाले असेल, तर २-३ मोठे चमचे पाणी घाला. उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळा. तसेच चवीनुसार मीठ घाला.

Healthy Breakfast

फोडणी

एका लहान कढईत १ छोटा चमचा तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि कढीपत्ता घालून परतून घ्या. ही गरम फोडणी आप्प्याच्या पिठात घालून चांगले मिसळा.

Easy Breakfast Recipe

सोडा घाला

आता आप्प्याचा साचा (आप्प्याचा पॅन) मध्यम आचेवर गरम करण्यासाठी स्टोव्हवर ठेवा आणि प्रत्येक साच्याला तेलाचे २ थेंब लावा. आप्प्याचा साचा गरम झाल्यावर, पिठामध्ये इनो घाला, नंतर थोडे पाणी घालून हलक्या हाताने मिसळा.

Easy Breakfast Recipe

आप्पे बेक करा

चमच्याने आप्पे स्टँडच्या सर्व साच्यांमध्ये पीठ घाला. मध्यम गॅसवर ३ ते ४ मिनिटे शिजू द्या. खालची बाजू सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर, वर थोडे तेल लावा आणि चमचा किंवा चाकूने आप्पे पलटा.

Easy Breakfast Recipe

सर्व्ह करा

दोन्ही बाजू सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर, आप्पे एका प्लेटमध्ये काढा. तुमचे गरमागरम, खुसखुशीत मक्याचे आणि रव्याचे आप्पे तयार आहेत. हिरव्या चटणी किंवा टोमॅटो केचप आणि गरम चहाबरोबर सर्व्ह करा.

Easy Breakfast Recipe

NEXT: लग्नासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर कसा असावा? आचार्य चाणक्यांनी दिल्या 'या' महत्त्वाच्या टिप्स

Marriage Tips
येथे क्लिक करा