Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे. तुम्ही दररोज ३०० रुपये गुंतवून १५ लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना

फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख रुपये

रोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा

प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. त्यासाठी आतापासूनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या पगारातील ठरावीक रक्कम बाजूला काढून गुंतवणूक करायची आहे. तुम्ही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनांमध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुमचे पैसे सुरक्षित असणार आहे.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. तुम्ही फक्त व्याजातून ४.४० लाख रुपये कमवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गुंतवणूक करु शकतात. या गुंतवणूकीवर सरकार गॅरंटी देते.ही योजना Zero Risk Scheme म्हणून ओळखली जाते.

जबरदस्त व्याज मिळणार (Post Office RD Scheme Interest)

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत ६.७ टक्के व्याज मिळते. या योजनेत तुम्ही फक्त १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत १८ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक लाभ घेऊ शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. या योजनेत व्याजावरदेखील व्याज मिळते.पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये तुम्ही जमा रक्कमेच्या ५० टक्के रक्कमेचं लोनदेखील घेऊ शकतात.

रोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा (Invest Daily 300 Rupees and Get 15 Lakh)

पोस्टाच्या या योजनेत तुम्ही दररोज ३०० रुपये गुंतवून १५ लाखांपेक्षा जास्त रुपये मिळवू शकतात. या योजनेत दररोज ३०० रुपये म्हणजे महिन्याला ९००० रुपये जमा करणार आहात. पाच वर्षांच्या मॅच्युरिटीपर्यंत तुम्ही ५.४० लाख रुपये जमा करणार आहात. तुमची रक्कम ६ लाख होईल. यानंतर अजून ५ वर्ष गुंतवणूक केल्यावर तुम्ही एकूण १०.८० लाख रुपये गुंतवणार आहात. तुम्हाला एकूण १५.२० लाख रुपये मिळणार आहेत

फक्त व्याजातून ४.४० लाख रुपये (Earn 4.40 Lakh Only from Interest)

तुम्ही १० वर्षात १०.८० रुपये गुंतवणार आहात. यावर तुम्हाला ४,४०,८८९ रुपयाचे व्याज मिळणार आहे. १० वर्षानंतर तुमच्या हातात एकूण १५,२०,८८९ रुपये असणार आहात. जवळपास ४.४० लाख रुपये तुम्ही व्याजातून मिळवणार आहात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Priyadarshini Indulkar Photos: तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील...

Viral Video: 20 वर्षीय तरूणीचा कारनामा; गर्दीचा फायदा घेत कांदिवली स्टेशनवर चोरलं २ लाखांचं मंगळसूत्र

Mumbai Local : लोकल प्रवाशांच्या अडचणीत भर; मध्य रेल्वेने घेतला धक्कादायक निर्णय

डासांसाठी तुम्ही वापरत असलेल्या २ अगरबत्त्या कायमच्या बंद, राज्य सरकारने कारखान्याला लावले कुलूप

SCROLL FOR NEXT