Post Office Scheme saam tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! महिन्याला १२५०० गुंतवा अन् फक्त व्याजातून मिळवा १८ लाख रुपये

Post Office PPF Scheme: पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना ही गुंतवणूकीसाठी योग्य आहे. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीनंतर ४० लाख रुपये मिळू शकतात. या योजनेत तुम्ही किती रुपये गुंतवायचे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

पोस्टाची पीपीएफ योजना

१५ वर्षानंतर मिळणार ४० लाख रुपये

गुंतवणूकीचं कॅल्क्युलेशन

प्रत्येकाने पगारातील एक ठरावीक रक्कम गुंतवणूक करायची असते. तुमचे पैसे तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवणूक करु शकतात. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करु शकतात. पीपीएफमधील गुंतवणूकीवर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. या योजनेत तुमची गुंतवणूक टॅक्स फ्री असणार आहे. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीनंतर लाखो रुपये मिळणार आहेत.

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक (PPF Investment Calculation)

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये तुम्हाला ७.१ टक्के व्याज मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळते. या योजनेत कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते. मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम ही टॅक्स फ्री असते.

पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ स्कीमचा लॉक इन कालावधी १५ वर्षांचा असणार आहे. या योजनेत तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणूकीला सुरुवात करु शकतात. तुम्ही एका वर्षभरात जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करु शकतात. योजनेचा कालावधी १५ वर्षांचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला अजून ५ वर्ष गुंतवणूक करायची असेल तर करु शकतात.

या योजनेत जर तुम्ही वर्षाला १.५ लाख रुपये म्हणजेच महिन्याला १२५०० रुपये गुंतवले पाहिजे. जर तुम्ही १५ वर्षांसाठी गुतंवणूक केली तर त्यावर ७.१ टक्के व्याजदर मिळेल. या योजनेत १५ वर्षात तुमची गुंतवणूक २२,५०,००० रुपये होणार आहे. त्यावर व्याज १८,१८,२०९ रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण ४०,६८,२०९ रुपये मिळणार आहे.

पीपीएफ योजनेअंतर्गत तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट ओपन करु शकतात. या योजनेत तुम्हाला लोन घ्यायचीही सुविधा मिळेल. या योजनेत तुम्हाला ५ वर्षांनंतर तुम्हाला पैसे काढता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे यांची एकत्रित चौकशी

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT