Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची सुपरहीट योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून महिन्याला ₹५५०० मिळवा

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळणार आहे. तुम्हाला फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर दर महिन्याला ५५०० रुपये मिळू शकतात.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी थोडीफार सेव्हिंग करत असतो. हेच पैसे जर तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवले तर तुम्हाला फायदा होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक लहान बचत योजना आहेत. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. काही योजनांमध्ये तर दर महिन्याला एक ठरावीक रक्कमदेखील दिली जाते. अशीच योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम योजनेत नावाप्रमाणेच दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळणार आहे. या योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. एका गुंतवणूक करुन तुम्हाला दर महिन्याला ५५०० रुपये मिळणार आहे.ही सरकारकडून चालवली जाणारी सुरक्षित योजना आहे.

दर महिन्याला खात्यात येणार पैसे

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर दर महिन्याला पैसे मिळणार आहेत. या योजनेत तुम्हाला पैसे मिळतील याची गॅरंटी स्वतः सरकार देते. त्यामुळे ही एक रिस्क फ्री योजना आहे. या योजनेत फक्त १००० रुपये गुंतवून तुम्ही अकाउंट उघडू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या एमआयएस स्कीममध्ये १८ वर्षांवरील प्रत्येकजण गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला सध्या ७.४० टक्के व्याजदर मिळते. हे व्याजदर दर तीन महिन्यांनी बदलत असते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे.

पोस्ट ऑफिस मंथली स्कीम ही एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट प्लान आहे. या योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे.व्याजातून तुम्ही दर महिन्याला पैसे मिळवू शकतात. या योजनेत सिंगल आणि जॉइंट अकाउंट ओपन करु शकतात. सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकतात. जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवू शकतात.

कॅल्क्युलेशन

पोस्ट ऑफिस मंथली स्कीममध्ये जर तुम्ही ९ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला चांगली रक्कम मिळणार आहे. सध्या योजनेवर ७.४ टक्के व्याजदर मिळते. त्यामुळे दर महिन्याला तुम्हाला ५५०० रुपये मिळणार आहे. जर तुम्ही जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवले तर ९,२५० रुपये मिळणार आहेत.त्यामुळे तुम्ही किती रक्कम गुंतवता यावर पैसे किती मिळणार हे अवलंबून असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mitali Mayekar Mangalsutra: ट्रेडिशनल ते वेस्टर्न, प्रत्येक साडीवर मॅचिंग होईल मिताली मयेकरच्या मंगळसूत्राच्या डिझाइन

Municipal Election : भाजपच्या पोलिंग एजंटकडून आचारसंहितेचा भंग, मीरा रोडमध्ये सकाळी नेमकं काय झालं?

Municipal Elections Voting Live updates : राज ठाकरे कुटुंबासह मतदानासाठी दाखल

Famous Director : प्रसिद्ध दिग्दर्शकाची फसवणूक; 5 लाखांचा गंडा, FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

मतदानाआधी पैशांचा पाऊस! 50 लाखांची रोकड जप्त, नोटांच्या गड्ड्या पाहून पोलिसही चक्रावले|VIDEO

SCROLL FOR NEXT