Porsche Macan EV launched in India  Saam Tv
बिझनेस

Porsche Macan: जबरदस्त रेंज आणि फीचर्ससह Porsche ने लॉन्च केली स्टायलिश SUV; जाणून घ्या किती आहे किंमत

Porsche Macan EV launched in India: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. केवळ नियमित वापरलेली वाहनेच नाही तर लोक इलेक्ट्रिक सेगमेंटमधील लक्झरी एसयूव्ही देखील खरेदी करत आहेत.

Satish Kengar

Porsche Macan EV launched in India:

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. केवळ नियमित वापरलेली वाहनेच नाही तर लोक इलेक्ट्रिक सेगमेंटमधील लक्झरी एसयूव्ही देखील खरेदी करत आहेत. यामुळेच लक्झरी कार कंपन्याही त्यांच्या ईव्हीचा सातत्याने विस्तार करत आहेत.

यातच जर्मन कार उत्पादक कंपनी Porsche ने आपली इलेक्ट्रिक SUV Porsche Macan भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. मात्र भारतीय बाजारपेठेत याचा फक्त एकच प्रकार विकला जाईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Porsche Macan Turbo EV ची प्रारंभिक किंमत 1.65 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. Porsche ने नवीन इलेक्ट्रिक SUV चे बुकिंग सुरु केली आहे. याची डिलिव्हरी वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे.  (Latest Marathi News)

एसयूव्हीच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर, याला स्पोर्टी लूक देऊन डिझाइन करण्यात आले आहे. Macan इलेक्ट्रिक एसयूव्हीची डिझाईन पोर्श टायकनसारखी दिसते. या एसयूव्हीमध्ये जबरदस्त 4 एलईडी एलिमेंट देण्यात आले आहे.

Porsche Macan Turbo EV च्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला एक लक्झरी केबिन सेटअप देण्यात आला आहे. या EV मध्ये तुम्हाला 12.6-इंच वक्र इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्टँडर्ड 10.9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टमसह तीन स्क्रीन मिळतात. याशिवाय, मागील प्रवाशासाठी 10.9-इंच पर्यायी टचस्क्रीन देखील देण्यात आली आहे.

Porsche Macan च्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर याची इलेक्ट्रिक मोटर 402bhp पॉवर आणि 650Nm टॉर्क जनरेट करते. ही SUV फक्त 5.2 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडते.

किती देते रेंज?

या मोडमध्ये एसयूव्ही एका चार्जवर 591 किमीची रेंज देते. ही SUV इलेक्ट्रिक वाहन प्रीमियम प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक (PPE) आर्किटेक्चरवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

SCROLL FOR NEXT