PM Vishwakarma Yojana Saam Tv
बिझनेस

PM Vishwakarma Yojana: स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकार देतंय कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांचे कर्ज

PM Vishwakarma Yojana Benefits: पीएम विश्वकर्मा योजनेत तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी ३ लाखांचे लोन दिले जाते. या योजनेत कोणत्याही हमीशिवाय तुम्हाला लोन दिले जाते.

Siddhi Hande

अनेकांची स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. परंतु अनेकदा पुरेसे भांडवल नसल्याने आपण व्यवसाय सुरु करु शकत नाही. त्यामुळेच तरुणांसाठी केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजना राबवली आहे. पीएम विश्वकर्मा योजनेत कारागिरांना बिनव्याजी कर्ज दिले जाते. पीएम विश्वकर्मा योजना नक्की आहे तरी काय जाणून घ्या.

लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरु केली होती. या योजनेत नागरिकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यांना कमी व्याजदरात लोन दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे या योजनेत लोन घेताना कोणतीही हमी द्यावी लागत नाही.

पीएम विश्वकर्मा योजनेत लोहार, मुर्तिकार, धोबी या लोकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत देशातील तब्बल ३० लाख तरुणांना फायदा होणार आहे. या लोकांना स्वतः चा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा विस्तार करण्यासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

विविध क्षेत्रातील कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवली आहे. या योजनेत १८ ट्रेड्सना लाभ दिले जातो. यासाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिले जाते. यात नागरिकांना मार्केटिंग आणि व्यवसाय कसा वाढवायचा याबाबत ट्रेनिंग दिले जाते. तसेच ट्रेनिंगच्या काळात दर महिन्याला ५०० रुपयांची स्टायपेंड दिली जाते. या योजनेत ३ लाखांच्या कर्जावर फक्त ५ टक्के व्याज आकारले जाते.

पीएम विश्वकर्मा योजनेत १८ ते ५० वयोगटातील नागरिकांना लाभ दिला जातो. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवरुन जाऊन अर्ज करावा लागेल.त्यानंतर आवश्यक कागदपत्रे भरुन तुम्हाला लोन दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

SCROLL FOR NEXT