job
jobSaam Tv

IRFC Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; IRFC मध्ये भरती; पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

IRFC Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
Published on

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशमध्ये मॅनेजर, पीआरओ, जनरल मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जात आहेत.

इंडियन रेल्वे फायनान्स कंपनीतील या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२५ आहे.

job
Bank Jobs: शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय? या बँकेत सुरु आहे भरती; ७५० रिक्त जागा; अशा पद्धतीने करा अर्ज

ग्रुप जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.ई/बीटेक (कॉम्प्युटर, सायन्स, आयटी) एमसीए / एमबीए केलेले असावे. याचसोबत २० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. जनरल मॅनेजर फायनान्स पदासाठी सीए / सीएमए / एमबीए इन फायनान्समध्ये पदवी प्राप्त केलेली आहे. याचसोबत १४ वर्षांचा अनुभव असावा.

मॅनेजर आयटी पदासाठी बी.ई/ बीटेक/ एमबीए/ डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत १५ वर्षांचा अनुभव असावा. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यू आणि प्रेझेंटेशनच्या आधारे होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज अधिकृत वेबसाइटवरुन डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर अर्ज भरुन जीएम/ एचआर अँड अॅडमिन, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, यूजी फर्स्ट फ्लोर, ईस्ट टॉवर, एनबीसीसी प्लेन, भीष्म पीतामह मार्ग, लोधी रोड, नवी दिल्ली येथे पाठवायचा आहे.

job
Job Openings Meta : तरुणांसाठी खुशखबर! जगातील नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी; शैक्षणिक पात्रता अन् पद कोणकोणती?

या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना पदानुसार पगार देण्यात येणार आहे. उमेदवारांना १,२०,००० ते २,००,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३७ ते ५५ वर्षे असावी.

job
IDBI Recruitment: शिक्षण पूर्ण झालंय? IDBI बँकेत नोकरीची संधी; ६५० रिक्त जागा, पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com