PM Vishwakarma Yojana saam tv
बिझनेस

PM Vishwakarma Yojana : काय सांगता! हमीशिवाय सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज; कसं अप्लाय करायचं? वाचा सविस्तर

Loan of 3 Lakhs Without Guarantee : तुम्हाला व्यावसाय सुरु करायचा असेल तर केंद्र सरकारमार्फत तब्बल ३ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यामुळे या बातमीतून याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

गरीब आणि गरजू व्यक्तींचा विकास व्हावा. त्यांना विविध क्षेत्रात काम करता यावं, हक्काचं घर असावं यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांतून चांगलं शिक्षण, वैद्यकीय सेवा अशा विविध गोष्टींचा लाभ घेता येतो. यासह तुम्हाला व्यावसाय सुरु करायचा असेल तर केंद्र सरकारमार्फत तब्बल ३ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यामुळे या बातमीतून याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

विश्वकर्मा योजना

विश्वकर्मा ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेतून छोटे-मोठे व्यावसायीक असलेल्या व्यक्तींना कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं. यामध्ये सोनार, लोहार, न्हावी, शिंपी अशा विविध व्यावसायांचा समावेश आहे. यासाठी पात्रता काय आणि हे कर्ज कसं मिळवायचं याची माहिती पुढे दिली आहे.

या नागरिकांना हमीशिवाय मिळणार ३ लाखांचं कर्ज

लोहाराचं काम करणाऱ्या व्यक्तींना आपला व्यावसाय मोठा करण्यासाठी सुरुवातीला लघूउद्योगासाठी हे कर्ज मिळतं दगड फोडून त्यापासून विविध वस्तू बनवणाऱ्या व्यक्तींना पुढे येण्यासाठी,त्यांची प्रगती व्हावी यासाठी देखील अशा व्यक्तींना स्वत:चा व्यावसाय सुरू करायचा असेल तर त्यांना हे कर्ज मिळतं.

बुरूड म्हणजेच ज्या व्यक्ती बांबूपासून टोपल्या बनवणे, चटया आणि सूर अशा विविध गोष्टी बांबू आणि त्यातील काठ्यांपासून बनवल्या जातात. हातावरचं पोट असलेल्या या व्यक्तींना देखील प्रगतीसाठी विश्वकर्मा योजनेतून कर्ज मिळतं.

चप्पला, बुटं शिवणाऱ्या व्यक्तींचं देखील हातावरचं पोट असतं. हा व्यावसाय मोठा करण्यासाठी त्या व्यक्ती देखील विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लोनसाठी अप्लाय कसं करायचं?

वरील यादीनुसार तुम्ही त्या व्यावसायात येत असाल तसेच तुमचे वय १८ पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या लोनसाठी अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला सार्वजनिक सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. पात्रता तपासल्यावर तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल तो तिथेच सबमीट करा.

फायदे

पात्र व्यक्तीला या योजनेतून बरेच फायदे मिळतात. सुरुवातीला तर ५०० रुपये स्टायपेंडसह तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते. टूलकिट खरेदी करण्यासाठी १५,००० त्यानंतर १ लाखा आणि उर्वरीत रक्कम अशी टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

SCROLL FOR NEXT