ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यावसाय म्हणून कुक्कुटपालनाचा व्यावसाय करतात.
हा व्यावसाय करताना शेतकरी कडकनाथ कोंबड्या पाळतात.
कडकनाथ ही कोंबड्यांची दुर्मिळ प्रजाती आहे. काही वर्षांपासून या प्रजातींच्या कोंबड्यांची मागणी वाढली आहे.
कडकनाथ कोंबडी मध्य प्रदेशातील झाबुआ आणि अलिराजपूर या भागांमध्ये आढळते. तिथे या कोंबडीला 'काळामाशी' असे म्हणतात.
या कोंबडीचा रंग काळा असण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिच्या शरीराताल मिलानिन रंगद्रव्य. या कोंबडीचे मास, त्वचा आणि रक्त काळ्या रंगाचे असते.
मिलानिन सह या कोंबडीच्या शरीरात लोह देखील भरपूर प्रमाणात असते. मिलानिन आणि लोह असल्यामुळे या कोंबडीचा रंग काळा असतो.
जरभरात काळ्या रंगांच्या कोंबड्यांच्या एकुण तीन जाती पहायला मिळतात. त्यातील एक म्हणजे कडकनाथ आणखी दोन प्रजाती चीन आणि इंडोनेशीयामध्ये आढळतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.