PM Ujjawala Yojana Saam Tv
बिझनेस

PM Ujjawala Yojana: पीएम उज्जवला योजनेत मिळतात मोफत गॅस सिलेंडर; आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया घ्या जाणून

PM Ujjawala Yojana For Women: केंद्र सरकारने महिलांसाठी खास पीएम उज्जवला योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना मोफत गॅस सिलिंडर आणि गॅस कनेक्शन दिले जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकारची पीएम उज्जवला योजना

पीएम उज्ज्वला योजनेत मिळतात मोफक गॅस सिलिंडर

पीएम उज्जवला योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

केंद्र सरकारने महिला सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आहे. महिलांनी स्वतः च्या पायावर उभे राहावे, त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने देशातील महिलांसाठी खास उज्जवला योजना राबवली आहे. या योजनेत सरकार महिलांना मोफत सिलेंडर दिले जातात. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल. (PM Ujjawala Yojana)

पीएम उज्जवला योजनेत महिलांना खूप फायदा होतो. पूर्वीच्या काळात महिलांना चुलीवर जेवण बनवावे लागायचे. त्यामुळे महिलांना खूप त्रास व्हायचा. याच महिलांना त्रास होऊ नये, यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत फ्री गॅस कनेक्शन आणि सिलेंडर दिले जाते. या योजनेत आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील महिलांना लाभ दिला जातो. ज्यांचे आर्थिक उत्पन्न खूप कमी आहेत.

पीएम उज्जवला योजनेसाठी कागदपत्रे (PM Ujjawala Yojana Required Documents)

पीएम उज्जवला योजनेत महिलांना काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते आणि पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे. याच कागदपत्रांच्या आधारावर अर्ज स्विकारला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळील गॅस एजन्सी किंवा ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. हे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर गॅस कनेक्शन आणि सिलेंडर दिले जाणार आहे.

प्रधानमंत्री उज्जवला योजनेत एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्श आहे. त्यांना योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे बीपीएल कार्ड असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राड्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे उद्या पुण्यात

Diwali Bonus: राज्यातील 'या' सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची धन धन दिवाळी; मिळाला २० वर्षातील सर्वाधिक बोनस

Crime : काम देतो म्हणत नेलं, सामूहिक अत्याचारानंतर बेदम मारलं; अमानुष छळामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

Sharad Pawar: निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला? बघा VIDEO

Tuesday Horoscope : आनंदी आनंद होणार, आयुष्यात सुंदर घटना घडतील; ५ राशींच्या लोकांचे नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT