ITR Filling
ITR FillingSaam Tv

ITR Filling : आयटीआर फाइल करण्याआधी कोणती कागदपत्रे हवीत? संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर

ITR Filling Required Documents: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. आयटीआर फाइल करताना तुमच्याजवळ ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
Published on

आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटचे १५ दिवस उरले आहेत. त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत आयटीआर फाइल केले नाही त्यांनी लवकरात लवकर करा.आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. ज्यांना ऑडिट करण्याची गरज नाही त्यांच्यासाठी शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. नोकरदार वर्ग आणि पेन्शनधारकांनी आयटीआर फाइल करायचा आहे.

ITR Filling
Income Tax Filing: ITR मधील छोट्या चुका पडतील महागात; होईल 200% दंड, अन् 7 वर्षाची कैद

दरम्यान, आयटीआर फाइल करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे आवश्यक आहे. तुम्हाला आयटीआर फाइल करण्यासाठी टीडीएस सर्टिफिकेट,फॉर्म 26AS, अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) आवश्यक आहे. दरम्यान, ही माहिती तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.

१. फॉर्म १६

जे लोक नोकरी करतात त्यांना कंपनीकडून फॉर्म १६ दिला जातो. यामध्ये तुमच्या पगारातून किती टॅक्स कापला जातो याची सर्व माहिती असते.

२. कॅपिटल गेन स्टेटमेंट

जर तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकले असतील तर तुम्हाला कॅपिटल गेन मिळाले आहेत. कॅपिटल गेन म्हणजे तुम्हाला किती फायदा झाला. हे तुम्हाला आयटीआरमध्ये दाखवावे लागते.

३. AIS

तुम्हाला एआयएस स्टेटमेंट हे आयकर विभागाच्या वेबसाइटवरुन मिळणार आहे. तुम्हाला एआईएस आणि फॉर्म 26AS हे कागदपत्र आयटीआर फाइल करताना लागणार आहेत.

४.बँक स्टेटमेंट

तुम्हाला तुमच्या बँकेचं, पोस्ट ऑफिसचं सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. त्यांना व्याज सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे.

ITR Filling
Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स कसं चेक करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

५. विदेशातील गुंतवणूकीची माहिती

जर तुम्ही विदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला आयटीआरमध्ये दाखवावे लागेल. त्यामुळे तुमच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे.

६. टॅक्स सेव्हिंग स्टेटमेंट

तुम्हाला टॅक्स सेव्हिंग स्टेटमेंट द्यावे लागणार आहे. तुम्ही ज्या मार्गाने

टॅक्स बेनिफिट मिळवतात त्याची माहिती द्यावी लागणार आहे.तुम्ही कलम 80C, 80CCD (1B), 80D, 80DD आणि 80TTA अंतर्गत सूट मिळू शकते.

७. आधार आणि पॅन कार्ड

आयटीआर फाइल करताना सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार आणि पॅन कार्ड. आधार कार्ड आणि पॅनकार्डशिवाय तुम्ही आयटीआर फाइल करु शकत नाही.

ITR Filling
ITR 2025 : फॉर्म 16 कसा आणि कुठे डाउनलोड करायचा? ही महत्वाची बातमी आयुष्यात येईल कामी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com