Sakshi Sunil Jadhav
आज तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास व स्पष्टता दिसेल.
नोकरी-व्यवसाय क्षेत्रात प्रगतीची चिन्हे आहेत. नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात, मात्र सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम बाळगा.
कौटुंबिक वातावरण थोडे मिश्र राहू शकते. जुन्या वादांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करावा. मित्रांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.
मानसिक ताण जाणवू शकतो. हृदयाशी संबंधित त्रास किंवा डोकेदुखी उद्भवू शकते, त्यामुळे काळजी घ्या.
कल्पकता, विश्लेषण करण्याची क्षमता आणि संशोधन वृत्ती आज जास्त ठळक होईल. कठीण कामे सुद्धा हुशारीने हाताळाल.
स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची वृत्ती व हट्टीपणा अडथळा निर्माण करू शकतो. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा.
आज प्रवास करताना काळजी घ्यावी तसेच महत्वाचे ऐवज जपावे.