Sakshi Sunil Jadhav
विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कला, चित्रकला, शिल्पकला यासारख्या गोष्टींमध्ये विशेष प्रगती होईल.
सर्व सुखाची, अर्थत्वाची असणारी आपली रास आहे. आजचा दिवस मात्र मातृसौख्य, वाहन सौख्य, शेतीवाडी गृहसौख्य या दृष्टीने चांगला आहे.
लेखक, वक्ते, प्रकाशक वेगळे धाडसाने धडाडीने काम करण्यासाठी आजचा दिवस आपल्या राशीला चांगला आहे.
एकत्र कुटुंबात राहताना अनेक वेळा तडजोड करावी लागते. वारसा हक्काचे संपत्ती बाबत दिवस आनंदी घटना घेऊन आलेला आहे.
आपल्यामधील असलेले कला गुण आज बहरतील. सकारात्मक वलय तयार होईल. दिवस आनंदी आहे.
आपले महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस सांभाळा. गहाळ होणे चोरी होणे विनाकारण मनस्ताप वाढणे अशा गोष्टी आज घडतील. काळजी घ्यावी.
आवडत्या लोकांबरोबर दिवस कसा गेला हे आज कळणारच नाही. सणासुदीच्या पूर्वार्धामध्ये धमाल गोष्टींची आजचा दिवस आहे.
आपले कार्यक्षेत्र रूंदावणार आहे. अनेक जणांची कामे एकट्यानेच करण्याची आपली हातोटी आज कामी येईल. कामाचा उच्चांक गाठला जाईल.
आज भाग्याची जर उत्तम साथ मिळाली तर वेगाने प्रगती होते. आजच्या दिवशी अशाच काही घटना आयुष्यात घडतील ज्या आश्चर्यकारक ठरतील. सद्गुरु कृपा राहील.
सोप्या गोष्टी ज्या हाकेच्या अंतरावर आहेत या विनाकारण क्लिष्ट होऊन बसतील. पण दिवसाच्या शेवटी सर्वकाही अलबेल आहे ही जाणीव होईल.
जोडीदाराबरोबर उत्तम वेळ घालवाल. काही न पटणाऱ्या गोष्टी सुद्धा आज सहज कराल.
एकमेका सहाय्य करू असा दिवस आहे. इतरांच्या अडचणी सोडवता सोडवता तुम्ही अडचणीत न येता त्यातून मार्ग दिसेल.