Sakshi Sunil Jadhav
चाणक्य निती आयुष्यात प्रत्येक गोष्टीत तुम्हाला फायदेशीर ठरु शकते.
नातेसंबंध असो किंवा कामाचे ठिकाण, प्रत्येक ठिकाणी संवादाचे महत्त्वाचा मानला जातो.
चाणक्यांच्या मते, एखाद्याला काही पटवून द्यायचे असेल तर आधी त्याच्या मनातील विचार समजून घेणे आवश्यक आहे.
समोरच्याच्या स्वभावाचा अभ्यास करून त्याच्याशी बोलताना सौम्य पण प्रभावी भाषा वापरली तर म्हणणे जास्त परिणामकारक ठरते.
कोणतीही गोष्ट सिद्ध करायची असेल तर ती तथ्य आणि अनुभवांच्या आधारे मांडली पाहिजे. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात विश्वास निर्माण होतो.
वाणीवर नियंत्रण आणि विचारांमध्ये स्पष्टता या दोन गोष्टी जर पाळल्या, तर कुणालाही आपल्या मताकडे आकर्षित करता येते.
त्यामुळे पटवून देण्याची ही कला फक्त युक्तीनेच नाही तर समजुतीने वापरली पाहिजे.