Sakshi Sunil Jadhav
महाबळेश्वरला अनेक लोक मोठ्या सुट्या घेऊन फिरायला जात असतात.
तुम्ही जर महाबळेश्वरला गेलात तर तिथलं जवळचं मिनी काश्मिर पाहायला विसरु नका.
टापोला मिनी काश्मिर आणि दुसरं म्हणजे प्रतापगड आणि आसपासची गावं तुम्ही येथे एका दिवसात पाहू शकता.
महाबळेश्वरपासून फक्त ३० मिनिटांच्या अंतरावर टापोला गाव आहे. यालाच मिनी काश्मिर असे म्हणतात.
तुम्ही महाबळेश्वर बसस्टॅंहून थेट टॅक्सी करुन १ तासात पोहोचू शकता.
तुम्ही महाबळेश्वरहून तुम्ही निसर्गरम्य घाटांचा आनंद घेत प्रवास करु शकता.
शिवसागर लेक, हिरव्यागार टेकड्या, जंगल सफारी, शांत वातावरण, गावाकडचं जेवण या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.