Sakshi Sunil Jadhav
नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील केळावण येथील भिवतास वॉटर फॉल पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.
काळ्या कातळावरून तब्बल पाचशे फुटांवरून फेसाळत खाली कोसळणारे पाणी अंगावर घेत निसर्गाचे अप्रतिम अनुभव तुम्हाला घेता येतील.
नाशिकपासून अवघ्या 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यापासून ते मार्चपर्यंत पर्यटकांची रांगच लागते.
येथे येणाऱ्यांसाठी स्थानिक महिला बचतगट उत्कृष्ट आदिवासी जेवणाची सोय करतात.
शिवाय, इथून जवळच असलेले शेपूझरी हे मिनी काश्मीर, जंगल सफारीसाठी खास ओळखले जाते.
खाजगी वाहनातून या हिरव्या वनराईत फेरफटका मारण्याचा आनंद वेगळाच.
निसर्ग, पाणी आणि आदिवासी संस्कृतीचा संगम अनुभवण्यासाठी भिवतास वॉटर फॉल हे ठिकाण पर्यटकांच्या यादीत असायलाच हवे.