
इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाइल करण्यासाठी अवघे २०-२५ दिवस उरले आहेत.आतापर्यंत अनेकांनी आयटीआर फाइल केले आहेत. आयटीआर फाइल केल्यानंतर अनेकांच्या खात्यात परतावादेखील जमा झाला आहे.परंतु अजून अनेकांनी आयटीआर फाइल केला आहे. दरम्यान, ज्या करदात्यांनी अद्याप आयटीआर फाइल केला नाही त्यांनी लवकरात लवकर करा. दरम्यान, आयटीआर फाइल केल्यानंतर त्याचं स्टेट्स कसं चेक करायचं ते जाणून घ्या.
दरम्यान, आयटीआर फाइल केल्यानंतर तुम्हाला स्टेट्स चेक करणे गरजेचे आहे. हा स्टेट्स कसा चेक करायचा त्याची प्रोसेस जाणून घ्या.
ITR स्टेट्स कसा चेक करायचा? (How To Check ITR Status)
तुम्हाला सर्वात आधी इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टलवर जाऊन यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचंय.
यानंतर e-File > Income Tax Returns > View Filed Returns वर जा.
यानंतर तुम्हाला तुम्ही फाइल केलेल्या आयटीआरची सर्व माहिती दिसणार आहे.
यानंतर तुम्हाला वर्ष टाकायचे आहे.
यानंतर तुम्हाला तिथे आयटीआरबाबत सर्व माहिती मिळणार आहे. तुमचे व्हेरिफिकेशन झाले की नाही, कुठपर्यंत प्रोसेस आहे याबाबत माहिती मिळणार आबे.
याचसोबत तुम्ही ITR-V Acknowledgement आणि ITR फॉर्म डाउनलोड करु शकतात.
उशिराने आयटीआर फाइल केल्यास काय होते? (What Happen If ITR File Late)
जर तुम्ही आयटीआर फाइल उशिराने आयटीआर फाइल केला तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला दंड भरावा लागेल. तुम्ही जर उशिरा आयटीआर फाइल करत असाल तर त्याला बिलेटेड आयटीआर म्हणतात. हा आयटीआर फाइल करताना तुमच्या उत्पन्नानुसार १००० ते ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आयटीआर फाइल करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.