Tax Refund: कामाची बातमी! आता उशिरा आयटीआर भरला तरीही मिळणार रिफंड; सरकारचा मोठा निर्णय

Tax Refund Rule In New Income Tax Bill: नवीन आयकर विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या नवीन विधेयकानुसार आता तुम्ही उशिरा आयटीआर भरला तरीही तुम्हाला रिफंड मिळणार आहे.
Income Tax Refund
Income Tax RefundSaam Tv
Published On
Summary

नवीन आयकर विधेयक मंजुर

करदात्यांना मिळणार फायदा

आता मुदतीनंतर आयटीआर फाइल केल्यावरही मिळणार रिफंड

करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतेच नवीन आयकर विधेयक मंजूर झाले. यामध्ये करदात्यांसाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. या बदलांमुळे थेट करदात्यांना फायदा होणार आहे. या नवीन आयकर विधेयकात संसदीय समितीने २८५ सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर करदात्यांचा विचार करुन अनेक सवलती मंजुर झाल्या आहेत.

Income Tax Refund
Income Tax Return: आता आयटीआर फाइल केल्यावर रिफंड कधी मिळणार? वाचा सविस्तर

१ एप्रिलपासून लागू होणार नवीन आयकर नियम

भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली ३१ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आला. या समितीने २१ जुलै रोजी शिफारसी सादर केल्या. सरकरने ११ ऑगस्ट रोजी यामध्ये काही सुधारणा करुन आयकर विधेयक सादर केले. त्यानुसार हा नवीन कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.

Income Tax Refund
Income Tax Return: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आता आयटीआरचा परतावा काही तासांत येणार

मुदतीनंतरही आयटीआर फाइल केल्यावर मिळणार परतावा (Now You File ITR After Deadline)

नवीन आयकर विधेयकानुसार, आयटीआर रिट्न मूदतीनंतर फाइल केला तरीही तुम्हाला परतावा मिळणार आहे. म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांनी शेवटची तारीख उलटून गेल्यावर रिटर्न फाइल केला आहे त्यांना रिफंडचे पैसे मिळणार आहेत.करदात्यांच्या हितासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Income Tax Refund
Income Tax Return: सोशल मीडियावर कमाई करणाऱ्यांना किती द्यावा लागतो टॅक्स? कोणता ITR फॉर्म भरावा लागतो?

नवीन नियम काय सांगतो? (What is New Income Tax Bill)

सध्या आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. त्यानंतरही तुम्हाला आयकर रिटर्न भरण्याची परवानगी आहे. याला बिलेटेड आयटीआर म्हणतात. फक्त तुम्हाला दंड आणि करावरील व्याज भरावे लागते. या नवीन विधेयकानुसार, उशिरा रिटर्न भरणाऱ्यांनाही परतावा मिळणार आहे, अशी तरतूद करण्यात आली आहे.

Income Tax Refund
Income Tax: देश इनकम टॅक्समुक्त होणार? कोट्यवधी नोकरदारांना दिलासा मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com