Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला मिळते ३००० रुपयांची पेन्शन, काय आहे योजना?

PM Shram Yogi Mandhan Yojana: केंद्र सरकारने पीएम श्रमयोगी मानधन योजना राबवली आहे. या योजनेत काही कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपये मिळतात.

Siddhi Hande

प्रत्येक कर्मचाऱ्याचे हे पीएफ अकाउंट असते. या पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला काही रक्कम जमा केली जाते. दरम्यान, जे कर्मचारी संघटित क्षेत्रात काम करत नाही त्यांना पेन्शन मिळत नाही. अशा कर्मचाऱ्यांसाठीच सरकारने एक योजना सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana)

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना २०१९ मध्ये लाँच केली होते. या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेत स्ट्रीट वेंडर, ड्राव्हर, रिक्षाचालक, मजूर, कामगार, बीडी मजूर किंवा कृषी श्रमिक कर्मचाऱ्यांना मदत मिळते.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना ३००० रुपये मासिक पेन्शन दिली जाते. ही योजना त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न १५००० रुपयांच्या आत आहे. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील कर्मचारी पात्र आहेत.

या योजनेत तुम्ही दर महिन्याला जेवढे पैसे गुंतवतात तेवढेच पैसे सरकारकडून जमा केले जातात. जर तुम्ही ५०० रुपये गुंतवले तर सरकारकडून ५०० रुपये मिळतात. या योजनेत जर १८ वर्षीय व्यक्तीने महिन्याला ५५ रुपये गुंतवायचे आहेत. तर ४० वयोगटातील कर्मचाऱ्यांना दर महिन्याला २०० रुपये जमा करायचा आहे. यानंतर तुम्हाला दर महिन्याला ३००० रुपये पेन्शन मिळते.

जर तुम्ही १८ वर्षांचे असाल तर तुम्हाला दर महिन्याला ५५ रुपये गुंतवावे लागेल. जर तुम्ही २९ वर्षांचे असाल तर १०० रुपये गुंतवावे लागतील म्हणजेच सरकारकडूनदेखील १०० रुपये मिळणार आहे. ४० वयोगटातील नागरिकांना २०० रुपये गुंतवावे लागणार आहे. तुम्हाला वयाच्या ६० वर्षापर्यंत हे योजनेत गुंतवणूक करायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT