Saving Scheme : रोज करा १२१ रुपयांची बचत अन् मुलीच्या लग्नापर्यंत २७ लाख जमा होतील; कशी आहे LICची खास 'कन्यादान पॉलिसी'

LIC Scheme : LICची 'कन्यादान पॉलिसी' ही कन्या असलेल्या आई-वडिलांसाठी खास पॉलिसी आहे. जाणून घ्या पॉलिसीविषयी
LIC News
LIC Scheme Saam tv
Published On

मुलीचं शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाची अजिबात चिंता करू नका. कारण एलआयसीने बाजारात आई-वडिलांसाठी खास पॉलिसी आणली आहे. 'कन्यादान पॉलिसी' असे एलआयसीचं उत्पादन आहे. या पॉलिसीत रोज १२१ रुपयांची बचत करावी लागेल. या पॉलिसीत बचत केल्याने २५ वर्षांत फंडात २७ लाख रुपये जमा होतील. या खर्चातून तुम्ही मुलीच्या शिक्षण ते लग्नाचा खर्च भागवू शकता.

एलआयसी ही लोकप्रिय एंडोमेंट पॉलिसी आहे. ही पॉलिसी कन्या असलेल्या आई-वडिलांसाठी बाजारात आणली गेली आहे. मुलीचं शिक्षण, लग्न खर्चासाठी ही चांगली पॉलिसी आहे.

पॉलिसीविषयी जाणून घ्या

या पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी दररोज १२१ रुपयांची बचत करावी लागेल. या पॉलिसीत महिन्याला ३६०० रुपयांची बचत करावी लागेल. या बचतीमुळे मुलीच्या शिक्षणासाठी लाखोंचा फंड तयार होईल. या 'कन्यादान पॉलिसी'चा मुदत कालावधी २५ वर्षांचा आहे.

LIC News
Sangli : आईचा हात पकडून मुलगा घरी निघाला; अर्ध्यात काळाने डाव साधला; ६ वर्षीय मुलाला डंपरने चिरडलं

तुम्हाला या पॉलिसीसाठी २२ वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. शेवटच्या ३ वर्षांत कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही. पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर फंडात २७ लाख जमा होतील. या पैशांतून मुलीचं उच्चशिक्षण, लग्नाचा खर्च करता येईल.

LIC News
Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी; देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एकाच हॉटेलमध्ये भेट? राजकीय चर्चांना उधाण

पॉलिसी सुरु असताना आकस्मिकरित्या वडिलांचं निधन झालं, तरीही कुटुंबावर कोणताही आर्थिक ताण येणार नाही. मुलीच्या वडिलांचं निधन झाल्यावर एलआयसीकडून पुढील सर्व प्रीमियम हप्ते भरले जातात. अपघातात मुलीच्या वडिलांचा किंवा पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला १० लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातील. तर पॉलिसीचा मुदत कालावधी संपल्यानंतर संपूर्ण रक्कम मुलीला मिळेल.

LIC News
Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

पॉलिसी खरेदी करताना व्यक्ती १८ ते ५० या वयोगटातील असावा. तर मुलीचं कमीत कमी १ वर्ष असायला हवं. ही पॉलिसी आई-वडिलांसाठी फार उपयोगी आहे. तुम्ही कमी उत्पन्नातही मुलीचं भविष्य सुरक्षित ठेवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com