PM Mudra Yojana Saam Tv
बिझनेस

PM Mudra Scheme: दहावी नापास आहात, व्यवसाय करायचाय? सरकार करणार मदत, गॅरंटीशिवाय २० लाखांचे कर्ज, वाचा नेमकी योजना

PM Mudra Scheme: केंद्र सरकारने पीएम मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेत २० लाखांचे लोन दिले जाते. स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी हे लोन दिले जाते.

Siddhi Hande

पीएम मुद्रा योजना

तरुणांना मिळते २० लाखांपर्यंतचे लोन

८वी पास तरुणांसाठी बिझनेस सुरु करण्याची संधी

केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत.केंद्र सरकारच्या अनेक योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. रोजगाराच्या संधी निर्माण होतात. केंद्र सरकारने तरुणांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. या योजनेत तरुणांना २० लाखांपर्यंतचे लोन मिळते.

२० लाखांचे लोन

केंद्र सरकारच्या पीएम मुद्रा योजनेत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी सधी मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत कोणत्याही प्रकारची प्रकारची गॅरंटी द्यावी लागत नाही. या योजनेत तुम्हाला कोलेटरल फ्री लोन मिळते.

केंद्र सरकार याआधी पीएम मुद्रा योजनेअंतर्गत १० लाखांचे लोन दिले जायचे. परंतु आता या योजनेतील लोनची किंमत वाढवण्यात आली आहे. बजेट २०२४-२५ मध्ये निर्मला सितारामन यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यांनी लोनची लिमिट वाढवून २० लाख रुपये करण्यात आली आहे.

४ कॅटेगरीत दिले जाते लोन

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत ४ कॅटेगरीत बिझनेस करण्यासाठी लोन देतात. या योजनेत शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस कॅटेगरीत लोन दिले जाते. या योजनेत शिशु कॅटेगरीत ५० लाख रुपये दिले जातात. किशोर कॅटेगरीत ५०,००० ते ५ लाख रुपये दिले जातात. तरुण कॅटेगरीत ५ ते १० लाख दिले जातात. तरुण प्लस कॅटेगरीत १० ते २० लाख रुपये लोन दिले जातात.

८वी पास तरुणांसाठी उत्तम संधी

पीएम मुद्रा योजना २०१५ मध्ये सुरु केली होती. या योजनेत कोणताही भारतीय नागरिक अर्ज करु शकतो. ८वी पास तरुणदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी तुम्हाला https://www.mudra.org.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी फरार आरोपी भरत भगतला अटक

Raj K Purohit Death : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन

Republic Day 26 : 'उरी' ते 'राझी'; प्रजासत्ताक दिनाला लहान मुलांना आवर्जून दाखवा 'हे' देशभक्तीपर चित्रपट

8th Pay Commission: लेव्हल १ ते १८; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

BMC Mayor Election: शिंदेंचं इकडे हॉटेल पॉलिटिक्स, तिकडे ठाकरेंचा डाव, BMC महापौरपदासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT