Matru Vandana Yojana Saam Tv
बिझनेस

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Matru Vandana Yojana For Pregnant Women: केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी मातृत्व वंदना योजना राबवली आहे. या योजनेत गर्भवती महिलांना ६००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी खास योजना राबवली आहे. केंद्र सकारची मातृवंदना योजना ही महिलांसाठी आहे.या योजनेत महिलांना आर्थिक मदत मिळेते.

केंद्र सरकारच्या मातृत्व वंदना योजनेअंतर्गत महिलांना ६ हजार रुपये दिले जातात. गर्भवती महिलांची बाळे कुपोषित राहू नये. त्यांना कोणतेही आजार होऊ नये, यासाठी ही मदत केली जाते.या योजनेत बाळाची आणि आईची काळजी घेण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. (Government Scheme)

केंद्र सरकारने २०१७ साली या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेत महिलांना ६ हजार रुपये दिले जातात.मातृवत्व वंदना योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय १९ पेक्षा जास्त असावे. या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

पीएम मातृत्व वंदना योजनेअंतर्गत ३ हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. यात पहिल्यांदा १ हजार रुपये दिले जातात. त्यानंतर दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. यातील काही पैसे बाळ जन्मल्यानंतर दिले जातात. या योजनेत महिलांना हॉस्पिटलतर्फे पैसे दिले जातात. याबाबत अधिक माहिती https://web.umang.gov.in/landing/department/pmmvy.html या वेबसाइटवर माहिती दिली आहे. (Pm Matru Vandana Yojana)

पीएम मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना लाभ मिळतो. ज्या महिला ४० टक्के दिव्यांग आहेत. त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्या महिलांकडे ई-श्रम कार्ड आहे. त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत महिलेला पहिल्या टप्प्या एक हजार रुपये दिले जातात. गर्भधारणेला ६ महिने झाल्यानंतर २ हजार रुपये दिले जातात. तर प्रसुतीनंतर बाळाच्या लसीकरणासाठी २ हजार रुपये दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : नगराध्यक्ष कोण? निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपची ३-३ नावे, प्रदेशाध्यक्षांकडे यादी पोहचली

Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

Dadpe Pohe Recipe : नाश्त्याला बनवा चटपटीत दडपे पोहे, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

गौरव खन्ना की अमाल मलिक कोण उचलणार 'Bigg Boss 19'ची ट्रॉफी? सोशल मीडियावर कुणाच्या नावाची चर्चा

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT