Government Scheme: दिव्यांग नागरिकांना ५००० रुपये; कोणत्या राज्याने घेतला निर्णय? काय आहे योजना? जाणून घ्या

Delhi Government Scheme For Disabled People: दिल्ली सरकारने दिव्यांग नागरिकांसाठी नवी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग नागरिकांना ५००० रुपये दिले जाणार आहे.
Government Scheme
Government SchemeSaam Tv
Published On

केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील अनेक योजना या दिव्यांग नागरिकांसाठी आहे. दिल्ली सरकारने दिव्यांग नागरिकांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेत दिव्यांग लोकांना दर महिन्याला ५००० रुपये दिले जातात.याबाबत माहिती मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली आहे.

सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, ६० टक्क्यांपेक्षा जास्त विकलांग असणाऱ्या लोकांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाणार आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Government Scheme)

Government Scheme
PM Internship Scheme : ९०,८०० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी, आजपासून नोंदणी सुरू; कुठे आणि कसा कराल अर्ज, वाचा सविस्तर

याबाबत माहिती देताना सांगितले की,ही योजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेत रजिस्ट्रेशन एका महिन्याच्या आत सुरु होण्याची शक्यता आहे. या योजनेचा प्रस्ताव गर्वनर यांच्याकडे पाठवण्याची शक्यता नाही. कारण, हे जनतेचे पैसे आहेत ते त्यांच्या कल्याणासाठी खर्च केले जाणार आहेत.

दिल्ली सरकराने Specailly Abled लोकांना दर महिन्याला ५००० रुपये देण्याची घोषणा केली आहे. एवढा मोठा निधी देणारे दिल्ली हे एकमेव राज्य आहे. (Scheme For Disabled People)

Government Scheme
APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

२०११ च्या जणगणनेनुसार, देशात दिव्यांग व्यक्तींची संख्या १.६८ कोटी आहे. ही संख्या देशातील लोकसंख्येच्या २.२१ टक्के आहे.RPwD अधिनियम २०१६ नुसार, २१ प्रकारचे दिव्यांग लोक आहेत. यामध्ये लोकोमीटर विकलांगता, अंधत्व, ऐकायला कमी येणे, बोलायला न येणे, तसेच बौद्धिक विकलांगता असणारे लोक जास्त आहे. याच लोकांना मदत करण्याची ही योजना दिल्ली सरकारने राबवली आहे.

Government Scheme
Government Scheme: केंद्र सरकारकडून महिन्याला मिळणार ३००० रुपये; कोणती योजना? कोण घेऊ शकतं लाभ? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com