PM Kisan Yojana Saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर

PM Kisan Yojana Update: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांना ७००० रुपये मिळाले आहेत.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता जमा झाला आहे. कोट्यवधि शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा झाले आहेत.परंतु देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ७००० रुपये जमा झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना अतिरिक्त ५००० रुपये दिले गेले आहेत.

या शेतकऱ्यांना मिळाले ७००० रुपये (These Farmers get 7000 Rupees)

आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना ७००० रुपये दिले आहेत. या योजनेत जवळपास ४५ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना अन्नदाता सुखीभव योजनेत पैसे दिले जातात. या योजनेत शेतकऱ्यांना ५००० रुपये दिले गेले आहे.

आंध्र प्रदेशमधील मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेत ९.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेत प्रत्येकी २००० रुपये दिले जाणार आहे. २०५०० कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना २००० रुपये नही तर ७००० रुपये दिले जातात.

शेतकऱ्यांना दिला दुप्पट बोनस

आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांसाठी ही योजना पीएम किसान योजनेसोबत जोडली आहे. या योजनेचं नाव अन्नदाता सुखीभव पीएम किसान योजना आहे. या योजनेत दरवर्षी २०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यात आता शेतकऱ्यांना आंध्र प्रदेश सरकारकडून ५००० रुपये आणि केंद्र सरकारकडून २००० रुपये दिले आहेत. या योजनेत ४५,८५,८३८ शेतकऱ्यांना ७००० रुपये दिले आहेत.

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकार दर वर्षांला २०,००० रुपये दिले जाणार आहे. दर चार महिन्यांनी हे पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे दर चार महिन्यांनी पीएम किसान योजनेसोबतच तुम्हाला या योजनेचे ५००० रुपये मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ७००० रुपये मिळणार आहेत.

पीएम किसान योजनेत किती पैसे मिळतात?

पीएम किसान योजनेत दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. २ ऑगस्ट रोजी २०वा हप्ता जमा करण्यात आला आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना ७००० रुपये मिळाले?

आंध्र प्रदेशमधील सरकारने अन्नदाता सुखीभव पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना ७००० रुपये मिळाले आहेत.

शेतकऱ्यांना ७००० रुपये का दिले?

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना २००० रुपये दिले आहेत तर अन्नदाता सुखीभव पीएम किसान योजनेत ५००० रुपये दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest Pain : छातीत दुखण्याचे कारण हार्ट अटॅक आहे कि गॅस, कसे ओळखाल? जाणून घ्या सविस्तर माहीती

Bichadna Song: दो दौर एक रास्ता...; 'सैयारा' फेम गायकाचं 'बिछडणं' हे डोळ्यात अश्रू आणणार नविन गाणं प्रदर्शित

Maharashtra Live News Update : यवत गावामध्ये सलग चौथ्या दिवशी जमावबंदी लागू

Mumbai To Surat Travel: मुंबई ते सूरत ट्रिप प्लॅन करताय? सर्वात जलद आणि स्वस्त प्रवासाचे पर्याय जाणून घ्या

Patoda News : देवदर्शनासाठी आले असता विपरीत घडले; धबधब्याच्या पाण्यात पोहत असताना एकाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT