PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: दिवाळीआधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार! या दिवशी पीएम किसानचा हप्ता जमा होण्याची शक्यता

PM Kisan Yojana 21st Installment Date: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार याची प्रतिक्षा शेतकरी करत आहेत. दरम्यान, पुढच्या महिन्यात कदाचित पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट

दिवाळीआधी शेतकऱ्यांना २००० रुपये मिळण्याची शक्यता

ऑक्टोबर महिन्यात येऊ शकतो २१वा हप्ता

केंद्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांना २-२ हजार रुपये दिले जातात. दरम्यान, आता शेतकऱ्यांना २१व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.लवकरच आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.

केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात पुढचा हप्ता येऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. या योजनेत २०वा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता.

पीएम किसान योजनेत २०वा हप्ता येण्यास उशिर झाला होता. जुलै महिन्यात हा हप्ता देण्यात यायला हवा होता. हा हप्ता उशिरा देण्यात आला. त्यानंतर आता २१वा हप्तादेखील पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पीएम किसान योजनेत सरकार ऑक्टोबर महिन्यात पैसे जमा करु शकते. दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीआधीच खुशखबर मिळणार आहे. आतापर्यंत २० हप्ते देण्यात आले आहे. त्यानंतर २१ वा हप्तादेखील दिला जाईल.

२१वा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा

पीएम किसान योजनेत २१वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला एक काम करायचे आहे. तुम्हाला ई केवायसी करायची आहे. जर तुम्ही ई केवायसी केले नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्ही पीएम किसानचा हप्ता येण्याआधी ई केवायसी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुसदच्या रस्त्यावर लाखोच्या संख्येने उतरले बंजारा बांधव

Sabudana Vada: नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा कुरकुरीत साबुदाणा वडा; सिंपल रेसिपी वाचा

Pahalgam attack Case : पहलगाम हल्ल्याच्या ५ महिन्यांनी सुरक्षा दलांना मोठं यश, दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ कोण?

पावळ्यानंतर हिवाळ्यात हाडं गोठणार; La Niñaचा भारतासाठी इशारा, कोणत्या राज्याला सर्वाधिक फटका?

Jalebi English Meaning: जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? कुठून आला जिलेबी हा शब्द

SCROLL FOR NEXT