PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसाठी पात्रता काय? कोणत्या वयोगटातील शेतकरी करु शकतात अर्ज? जाणून घ्या सविस्तर

PM Kisan Yojana Eligibility: पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये मिळतात. या योजनेत १८ पेक्षा जास्त वयोगटातील शेतकरी लाभ घेऊ शकतात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात शेतकऱ्यांसाठी एक खास योजना राबवली आहे. केंद्राने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेसाठी पात्रता काय, कोणते शेतकरी योजनेसाठी अर्ज करु शकतात याबाबत आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत.

भारतातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी योजना सुरु केली आहे. २०१९ मध्ये ही योजना सुरु केली होती. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात.

योजनेची पात्रता (PM Kisan Yojana Eligibility)

पीएम किसान योजनेत सरसकट सर्व शेतकरी लाभ घेऊ शकतात का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पीएम किसान योजनेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील शेतकरी लाभ घेऊ शकतात. जर तुमचे वय १८ पेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

पीएम किसान योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ठरवण्यात आल्या आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्याच शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये मिळतात. या योजनेत फक्त त्याच शेतकऱ्यांना लाभ मिळतो ज्यांच्याकडे जमीन आहे. जे शेतकरी दुसऱ्याची शेती करतात. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर कोणी सरकारी नोकरी करत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पेन्शनधारकांना जर १०,००० रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल किंवा ते इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT