PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता या तारखेला येणार; स्टेट्स कसं चेक करायचा? जाणून घ्या सविस्तर

PM Kisan Yojana Status: पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात. या योजनेसाठी तुमचा स्टेट्स कसा चेक करायचा ते जाणून घ्या.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.

PM Kisan Yojana
Government Scheme: पाचवी पास महिलांसाठी खुशखबर! 'या' योजनेमुळे व्हाल स्वावलंबी, कमवाल लाखांच्या घरात

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे हा आहे. या योजनेत शेतीसाठी आवश्यक गोष्टी घेण्यासाठी मदत केली जाते.

पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार?

पीएम किसान योजनेत १९वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात आला होता. यामध्ये ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले होते. एकूण २२००० कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाला. त्यानंतर पुढचा हप्ता जून महिन्यात येण्याची शक्यता आहे. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातात.

जूनमध्ये हप्ता आल्यानंतर पुढच्या चार महिन्यांनी पुढचा हप्ता येईल. २०वा हप्ता जूनमध्ये येणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु सरकार लवकरच याबाबत घोषणा करु शकते.

केवायसी अनिवार्य

पीएम किसान योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करु शकतात. याचसोबत नाव, जन्मतारीख, आयएफएससी कोड, मोबाईल नंबर ही माहिती द्यायची आहे. यानंतर तुमच्या रजिस्टर फोन नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यावर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पती-पत्नीलाही लाभ मिळणार? पुढचा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर

स्टेट्‍स कसा चेक करायचा?

सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Know Your Status वर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाका.

कॅप्चा कोड भरुन ओटीपी टाका. यानंतर तुम्हाला स्टेट्‍स दिसेल.

PM Kisan Yojana
Success Story: जिद्द! तिनदा UPSC क्रॅक पण मुलाखतीत फेल; हार नाही मानली; चौथ्या प्रयत्नात IAS झाला; महाराष्ट्राच्या लेकाची यशोगाथा वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com