Poco C75 5G: एक नंबर! देशातील सर्वात स्वस्त फोन लॉन्च; Redmi आणि Lava ला देणार टक्कर, जाणून घ्या फीचर्स

5G Smartphones Under 10,000 : Poco ब्रँडचा नवीन फोन Poco C75 5G लॉन्च झालाय. हा फोन देशातील सर्वात स्वस्त 5G फोन आहे. रेडमी आणि लावा सारख्या फोनचं मार्केट हा फोन खाणार असल्याचं म्हटलं जात आहे. या फोनचे फीचर्स जाणून घेऊ.
 Poco C75 5G Lanch
5G Smartphones Under 10,000 Saam Tv
Published On

देशातील मोबाईल मार्केटमध्ये 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन सेगमेंटची मोठी मागणी आहे. या सेगमेंटमध्ये 5G फोनची कमतरता आहे, पण आता Poco ने C75 5G हा फोन बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च केलाय. हा देशातील सर्वात स्वस्त 5G फोन आहे. आता तुम्ही म्हणाल स्वस्त म्हणजे किंमत किती असेल. हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त 8,000 रुपयांमध्ये घेता येणार आहे.

हा फोन बाजारात Redmi आणि Lava सारख्या स्मार्टफोन निर्मात्यांसाठी एक मोठे आव्हान निर्माण करणार आहे. लावा कंपनीने 8 हजार रुपयांपेक्षा स्वस्त 5G फोन मार्केटमध्ये उतरवले नाहीत. परंतु LAVA Blaze 2 5G ची किंमत या फोनच्या आसपास आहे. या फोनची किंमत 8999 रुपये आहे. Redmi A4 5G देखील आहे ज्याची किंमत 8498 रुपये आहे.

 Poco C75 5G Lanch
ऐका हो ऐका! लवकरच लॉन्च होणार OnePlus 13R, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

दिल्लीतील एका कार्यक्रमात Poco C75 5G लाँन्च करण्यात आलाय. या फोनच्या फीचर्स आणि किंमतीबाबत अनेक गोष्टी आधीपासून समोर येत आहेत. पण आता लॉन्च झाल्यानंतर या फोनचे सर्व तपशील समोर आलेत. याशिवाय आणखी एक फोन Poco M7 Pro 5G लाँन्च करण्यात आलाय.

Poco C75 5G ची किंमत काय ?

Poco C75 5G ची किंमत 7,999 रुपये आहे. यामध्ये कंपनी 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल मेमरीचा पर्याय देण्यात आलाय. हा फोन तुम्ही ऑनलाइन घेण्याचा विचार करत असाल तर या फोनची विक्री 19 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. या सेगमेंटमधील हा पहिला फोन आहे ज्यामध्ये सोनीचा कॅमेरा सेटअप देण्यात आलाय,असा दावा कंपनीकडून देण्यात आलाय.

 Poco C75 5G Lanch
एक नंबर! आता कॉलसाठी नसणार SIMची गरज; भारतात पहिल्यांदा Satellite to Device सर्विस सुरू

Poco C75 5G काय आहेत फीचर्स

Poco C75 5G मध्ये 6.88-इंच टचस्क्रीन, Snapdragon 4S जनरेशन 2 चिपसेट आहेत. या फोनची मेमरी 128 GB पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मेन रिअर कॅमेरा असणार आहे. तसेच , एक दुय्यम लेन्स असेल, तर कंपनीने सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देखील दिलाय. दीर्घ काळ वापरता यावा यासाठी या फोनमध्ये 5,160 mAh ची बॅटरी देण्यात आलीय.

Poco M7 Pro 5G फोन

या फोनसोबत कंपनीने Poco M7 Pro 5G फोन देखील लॉन्च केलाय. यात 6.67 इंचाचा फुल एचडी एमोलेड डिस्प्ले आहे. हे गोरिल्ला ग्लास 5 सह येईल. यात MediaTek डायमेंशन 7025 अल्ट्रा चिपसेट असणार आहे. हे 8 GB रॅमसह 128 GB आणि 250 GB स्टोरेज पर्यायांमध्ये येईल. त्यांची किंमत अनुक्रमे 13,999 रुपये आणि 15,999 रुपये आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा Sony LYT 600 मुख्य कॅमेरा असणार आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेल कॅमेराही देण्यात आलाय. तसेच 5,110 mAh चा बॅटरी देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com