PM Kisan 23rd Installment, google
बिझनेस

PM Kisan 23rd installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! बँक खात्यात २००० रुपये जमा, स्टेप बाय स्टेप असं करा चेक

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांची अखेर चिंता मिटली. नुकताच पीएम किसान योजनेचा हप्ता यायला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा झाले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पीएम किसान योजनेचा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. पीएम किसान योजनेचा हा २३ वा हप्ता आहे. यामध्ये २००० रुपये प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नाहीत.

पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन नंबर (PM Kisan 23th Installment Status Check)

जर तुम्ही शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल. कारण या योजनेत तुम्हाला वर्षाला ६००० रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. पण आत्तापर्यंत तुमच्या ही रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही हेल्पलाइन नंबर १५५२६१ किंवा १८००-१८०-१५५१ या नंबरवर कॉल करून हप्त्याची संपूर्ण माहिती मिळवू शकता. तसेच शेती संबंधित इतर योजनांची माहिती मिळवू शकता.

पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा झालाय का हे कसे तपासायचे? (PM Kisan 23th Installment Status Check)

पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज सायंकाळी ४ वाजल्यापासून यायला सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला याचा हप्ता आला नसेल तर तुम्ही एकदा तुमचा स्टेटस तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर आलेला मेसेज तापासावा लागेल.

जर मेसेज आला नसेल तर बँक पैसे क्रेडिट झालेला SMS पाठवू शकते. त्यावर लक्ष ठेवा. जर मेसेज आला नसेल तर पासबूकची एन्ट्री करून तुम्ही खात्री करून घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना बसला मोठा धक्का! एकाच झटक्यात भाव गगनाला भिडले, काय आहेत नवे दर?

Maharashtra News Live Update: ....अन्यथा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचा व शासकीय वाहनांचा लिलाव करणार- रविकांत तुपकर

Cardamom Benefits : सलग १५ दिवस वेलची खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' ६ महत्त्वाचे बदल

Career Horoscope : आजपासून ‘या’ ५ राशींचं नशीब पालटणार! कामाचा ताण होईल कमी अन् पैशांचा पाऊस पडणार

SCROLL FOR NEXT