PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

PM Kisan Yojana 22nd Installment Date: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

२२वा हप्ता कधी येणार?

फेब्रुवारीत येऊ शकतात ₹२०००

देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात.या योजनेत प्रत्येक तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत शेतकऱ्यांना २१ हप्ते दिले होते. यानंतर २२वा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना २००० रुपये कधी मिळणार?

शेतकऱ्यांना वर्षभरात ३ हप्त्यांमध्ये प्रत्येकी २००० रुपये दिले जातात.दर चार महिन्यांनी हे पैसे दिले जातात. आता शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात आला होता. हा हप्ता ऑक्टोबरमध्ये द्यायला हवा होता. दरम्यान, आता त्यानंतरचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याच शक्यता आहे. फेब्रुवारीच्या कोणत्याही आठवड्यात शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेले नाही.

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी हे का कराच (PM Kisan Yojana eKYC)

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर योजनेचा हप्ता मिळणार आहे. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे. यासाठी सर्वात आधी पीएम किसानच्या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर फार्मर्स कॉनरवर क्लिक करा. तिथे तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला फोन नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर केवायसीची प्रोसेस पूर्ण होईल.

पीएम किसान योजनेचा स्टेट्स कसा चेक करायचा? (PM Kisan Yojana Status Check)

तुम्हाला पीएम किसान योजनेचा स्टेट्सदेखील चेक करता येतो. यासाठी वेबसाइटवर जाऊन स्टेट्स या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला विचारलेली माहिती भरा. यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्स दिसेल. त्यावरुन तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत दोघे जण धावत्या लोकलमधून पडले; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

Dhananjay Munde: कृषी साहित्य खरेदी घोटाळा प्रकरण; धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून क्लिन चीट

नराधम शिक्षकाकडून आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; गरोदर राहिल्यानंतर झाला भंडाफोड, अहिल्यानगरमध्ये खळबळ

Mumbai Tourism : लोणावळा-खंडाळा विसरा! मुंबईजवळचं 'हे' ठिकाण पाहिलंत का? एकदा जाल तर घरचा रस्ता विसराल

SCROLL FOR NEXT