PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट, ८ दिवसात खात्यात ₹२००० येणार?

PM Kisan Yojana 22nd Installment Date: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांना २००० रुपये मिळू शकतात.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार?

या तारखेला येऊ शकतात खात्यात पैसे

तुम्हाला मिळणार की नाही?

पीएम किसान योजनेचे लाभार्थी २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसानचा २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. लवकरच हे पैसे दिले जातील, असं सागितलं आहेत. आता शेतकऱ्यांना २००० रुपये कधीपर्यंत दिला जाईल, याची संभाव्य तारीख समोर आली आहे.

या तारखेला येऊ शकतात पैसे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीनंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्याच्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाऊ शकतात.त्यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या महिन्यात गुड न्यूज मिळू शकते.

पीएम नरेंद्र मोदी १३ मार्च रोजी आसामच्या कोकराझार येथे दौऱ्यावर आहेत. हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान पीएम किसानच्या २२व्या हप्त्याची घोषणा केली जाऊ शकते.दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

अशा पद्धतीने चेक करा स्टेट्‍स

पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही याचा स्टेट्‍स ऑनलाइन पद्धतीने चेक करा.

सर्वात आधी तुम्हाला https://pmkisan.gov.in/ वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Know Your Status वर क्लिक करा.

यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो टाकून वेरिफाय करा.

ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्‍स कळणार आहे. तुम्हाला पैसे मिळणार की नाही याची माहिती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT