PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे पैसे वाढणार? या दिवशी २१वा हप्ता येण्याची शक्यता

PM Kisan Yojana 21st Installment Date: पीएम किसान योजनेच्या २१व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, हा हप्तादेखील पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार?

या दिवशी २१वा हप्ता खात्यात जमा होणार

२१वा हप्ता जमा होण्यापूर्वी हे काम कराच

पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे. केंद्र सरकारची ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. या योजनेत ऑगस्ट महिन्यात सरकारने २०वा हप्ता दिला. त्यानंतर २१व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत.

पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता जमा होण्यास उशिर झाला. जवळपास मुदतीनंतर २ महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. काही तांत्रिक कारणांमुळे हा हप्ता येण्यास उशिर झाला. दरम्यान, आता पीएम किसान योजनेचा निधी वाढवला जाणार असल्याचे बोलले जात आहेत.

पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता उशिरा आला. त्यानंतर २१ वा हप्ता दोन महिन्यात येणार की चार महिन्यात याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे, याचसोबत पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवला जाणार का असाही प्रश्न विचारला जात आहे.

पीएस किसान योजनेचा हप्ता वाढणार का? (PM Kisan Yojana Installment Will Increase)

केंद्र सरकार बजेट सादर करण्यापूर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.परंतु कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सध्या पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या योजनेत २०वा हप्त्यासाठी ३.९ लाख कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे.

२१वा हप्ता कधी येणार? (PM Kisan Yojana 21st Installment Date)

सरकारी पीएम किसान योजनेचा हप्ता वर्षभरात तीन वेळा देते. प्रत्येक चार महिन्यांनी हे पैसे दिले जातात. आता २०वा हप्ता जूनऐवजी ऑगस्टमध्ये देण्यात आला. त्यामुळे कदाचित २१वा हप्तादेखील लांबणीवर जाऊ शकतो. परंतु २१ वा हप्ता हा ऑक्टोबरमध्ये यायला हवा. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर हप्ता लांबणीवर गेला तर शेतकऱ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागेल.

शेतकऱ्यांनो हे काम कराच (PM Kisan Yojana Farmers Do These Work Before Installment)

२१वा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही योजनेअंतर्गत केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता जमा होण्यापूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केवायसी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation: बायकोकडून ५० रुपये घेतले अन्..; ओबीसी आरक्षणावरून आणखी एका तरुणाने आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: - नवरात्रौत्सवानिमित्त ठाण्यातील टेंभी नाक्यावर रश्मी ठाकरे यांची हजेरी

उंच डोंगरावर गेले, कारमध्येच शरीरसंबंध ठेवले, पण एका चुकीमुळे दोघांचाही मृत्यू

Glowing Skin Tips: केळीपासून घरीच करा 'असा' फेशियल, काही मिनिटांत स्कीन करेल ग्लो

Pune: घरासमोर खेळताना चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला, फरफटत नेत शरिराचे लचके तोडले; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT