PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, हे काम आताच करा, अन्यथा मिळणार नाही ₹२००० ; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

PM Kisan Yojana 21st Installment Update : पीएम किसान योजनेत २१वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, तुम्हाला त्याआधी केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये

केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार पैसे

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना आता उद्या २१वा हप्ता मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी २१व्या हप्त्याची वाट पाहत होते. दरम्यान, आता शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पैसे जमा केले जाणार आहेत. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी ईकेवायसी करायची आहे.

हे काम आताच करा अन्यथा मिळणार नाही पीएम किसानचे २००० रुपये (PM Kisan Yojana Update)

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केवायसी करावी लागणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर लगेच करा.केवायसी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

केवायसी कशी करायची? (PM Kisan Yojana KYC Link)

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

यानंतर फार्मर्स कॉनर या सेक्शनमध्ये जाऊन ई केवायसी ऑप्शन निवडा.

यानंतर तुमचा आधार नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाका. तुम्हाला ओटीपी येईल.

ओटीपी टाकल्यानंतर प्रोसेस पूर्ण होईल. यानंतर तुम्हाला ईकेवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज येईल. यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.

केवायसी करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड गरजेचे आहे. याचसोबत आधारशी लिंक मोबाईल नंबरदेखील आवश्यक आहे.

याचसोबत तुम्ही ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवर जाऊन केवायसी पूर्ण करु शकतात. तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्याची माहिती द्यायची आहे. यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT