PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार

PM Kisan Yojana 20th Installment Date; पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. याबाबत पुढच्या काही दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या निधीची कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. हा २०वा हप्ता जून महिन्यात येणे अपेक्षित होते. परंतु हा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यामुळे कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. या योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. या योजनेचा २० व्या हप्त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.

कधी येणार पुढचा हप्ता? (When Will PM Kisan Yojana Installment Come)

मिडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता १८ जुलै २०२५ रोजी येऊ शकतो. याच दरम्यान कधीही खात्यात पैसे जमा होती. या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारीमधील एका कार्यक्रमात या हप्त्याची घोषणा करु शकतात. दरम्यान, अजूनही या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

यादीत तुमचं नाव आहे का? (How To Check PM Kisan Yojana Status)

सर्वात आधी https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर जावे.

यानंतर किसान कॉर्नर सेक्शनवर जाऊन लाभार्थी यादीवर क्लिक करा.

यानंतर राज्य, जिल्हा, गाव याची माहिती भरा.

यानंतर रिपोर्ट प्राप्त करा या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्ही CSC किंवा सेल्फ रजिस्ट्रेशन स्टेट्सवरक्लिक करा.

यानंतर आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन आणि अप्रुवल सेट्ट तुम्हाला दिसेल.

२० वा हप्ता येण्याआधी हे काम करा

पीएम किसानचा हप्ता येण्यापूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन फार्मर्स कॉनरवर क्लिक करायचे आहे. यानंतर केवायसी ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आधार नंबर टाका. यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल तो टाका. यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

Mohammed Siraj : चेंडू बॅटला लागून स्टंपवर आदळला, इंग्लंडला शेवटची विकेट मिळाली अन् सिराजला मैदानावरच रडूच कोसळलं

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; ११ आरोपींविरोधात १,६७० पानी दोषारोपपत्र दाखल, कुणावर काय आरोप?

प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यामागे कुणाचा हात? ठाकरे सेनेकडून काटेचे फोटो पोस्ट

Eknath Shinde News : मला कारवाईचा बडगा उगारायला आवडणार नाही, पण...; एकनाथ शिंदे यांचा आमदारांना कडक इशारा

SCROLL FOR NEXT