PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे २००० रुपये जमा झाले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

PM Kisan Yojana 20th Installment Status: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे आले की नाही हे अशा पद्धतीने चेक करा.

Siddhi Hande

केंद्राने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत कोट्यवधी शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. वर्षभरात ६००० रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातात. दरम्यान, आता शेतकरी २०व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु कधीही पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही अशा पद्धतीने करा चेक.

मोबाईल नंबरवरुन चेक करा स्टेट्‍स (PM Kisan Yojana Status)

तुम्हाला जर तुमचा स्टेट्‍स चेक करायचा असेल तर या स्टेप्स फॉलो करा.

१. सर्वात आधी पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

२. यानंतर Farmers Corner वर जा. त्यानंतर Know Your Registration Number वर क्लिक करा.

३. यानंतर आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर टाका. त्यांतर कॅप्चा कोड टाकून ओटीपी टाका.

४.यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसणार आहे.

लाभार्थ्यांची लिस्ट कशी चेक करायची?

  • सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जा. त्यानंतर फार्मर्स कॉनर्रवर क्लिक करा.

  • यानंतर Beneficiary List या ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक, ग्रामपंचायत हे सिलेक्ट करा.

  • यानंतर त्या लिस्टमध्ये लाभार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव आणि हप्त्याचा स्टेट्‍स तुम्हाला स्टेट्‍स तुम्हाला दिसणार आहे.

रजिस्ट्रेशन नंबर टाकून करा चेक

  • सर्वात आधी पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

  • यानंतर Know Your Status वर क्लिक करा.

  • यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

  • यानंतर Get Data वर क्लिक करा. यानंतर तुमच्या स्टेट्‍सची माहिती तुम्हाला स्क्रिनवर दिसणार आहे.

२०वा हप्ता कधी येणार? (PM Kisan Yojana 20th Installment Date)

पीएम किसान योजनेत दर ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. शेतकऱ्यांना एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च अशा चार हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. दरम्यान, २०वा हप्ता जून महिन्याची येण्याची शक्यता होती. मात्र, आता जून महिना संपत आला आहे त्यामुळे हा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT