
एलॉन मस्कच्या एक्स प्लॅटफॉर्मवर नवीन मेसेजिंग फीचर लॉन्च केलंय. याचे नाव एक्स चॅट आहे. या फीचरच्या मदतीनं एंड टू एंड इनक्रिशप्शन, ऑटो डिलेटेड मेसेज आणि कोणत्याही प्रकारचे फाईल्स पाठवता येतील. हे फीचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
एलॉन मस्कने रविवारी पोस्ट करत या फीचरची माहिती दिलीय. एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, एक्स चॅटला रोलआउट केलं जाणार आहे. जे इनक्रिप्शन Vanishing messages आणि फाइल्स पाठवण्याचा पर्याय सुद्धा यात दिला जाणार आहे.
बीटकॉइन स्टाइल इनक्रिप्शनचा वापर यात करण्यात आलाय. मस्कनं आपल्या पोस्टमध्ये दावा केलाय की, XChat मध्ये Bitcoin स्टाइल इनक्रिप्शनचा वापर करण्यात आलंय. त्याला नवीन आर्किटेक्चर तयार करण्यात आलंय. मस्क यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये एक्स चॅटच्या मदतीनं युझर्स ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्सही करू शकतील. यासाठी मोबाईल नंबर लिंक करण्याची गरज नाहीये.
टेक क्रंचच्या रिपोर्ट्सनुसार, एक्स चॅटचं अजून टेस्टिंग चालू आहे. दरम्यान सामान्य युझर्सला याचा वापर कधीपासून करू शकतील, याची माहिती कंपनीने दिली नाहीये. एक्स प्लॅटफॉर्मने इनक्रिप्ट मेसेजिंग सर्व्हिसची सुरुवात वर्ष २०२३ मध्ये केली होती. त्यावेळी ही सेवा काही मर्यादित लोकांपूरती मर्यादित होती. XChat मध्ये व्हॉट्सअॅप प्रमाणे फीचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान व्हॉट्स अॅपमध्ये आपल्याला मोबाईल नंबरने लॉगइन करावे लागते. जर एक्स चॅटवर मोबाईल नंबर जोडण्याची गरज नसते.
End-to-End Encryption हे एक सिक्योरिट स्टिटम आहे, त्याच्या मदतीने मेसेज पाठवारा आणि मेसेज मिळवणाऱ्यामध्ये मेसेज सुरक्षित राहत असते. याच दरम्यान तिसरा कोणी व्यक्ती या मेसेजला डिकोड करू शकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याला मेसेज पाठवता तेव्हा तो मेसेज तुमच्या डिव्हाइसवर एन्क्रिप्ट होतो. यानंतर ते इंटरनेटच्या मदतीने पुढे ट्रन्सफर केले जाते. अशा परिस्थितीत, मेसेज मिळणाऱ्याला मेसेज डिक्रिप्ट होतो. हे फीचर्स व्हॉट्सअॅप, सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या मेसेजिंग अॅप्समध्ये उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.