PM Kisan Samman Nidhi Saam Tv
बिझनेस

PM Kisan Samman Nidhi: विनाअडथळा पीएम किसानचे 2000 रुपये हवे तर 'ही' तीन कामे लगेच करा

PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जातात.

Bharat Jadhav

देशातील शेतकाऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षाकाठी ६ हजार रुपये मिळत असतात. केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून दिले जातात. केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत 19 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलीय.

शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता देण्यात आला होता. आता शेतकरी 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. पीएम किसानच्या दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचा कालावधी असतो. पण अर्जदार शेतकऱ्यांनी तीन गोष्टी अपूर्ण ठेवल्यास लाभार्थ्यांना पैसा मिळत नाही. जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्यात काही त्रुटी नाही ना हे तपासून घ्या. त्यात सुधारणा करण्यासाठी 31 तारखेपर्यंत मुदत आहे.

शेतकरी मित्रांनो लाभ घेण्यासाठी 'ई-केवायसी, बँक खातं आधार लिंक आणि जमीन पडताळणी' आवश्यक आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जून महिन्यात मिळेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हालाही योजनेचा पैसा विनाअडथळा हवा असेल तर शेतकऱ्यांनी विनाअडथळा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. बँक खातं आणि आधार क्रमांक लिंक असणं आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणं आवश्यक आहे.

याशिवाय त्या शेतकऱ्यानं त्याची पडताळणी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. याबाबींची पूर्तता करण्यास पीएम किसान सन्मान निधीतर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. 1 मे ते 31 मे दरम्यान या बाबी अपूर्ण असतील तर त्या पूर्ण केल्या पाहिजेत. पीएम किसान सन्मान निधी योजना निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सॅच्युरेशन ड्राईव्ह सुरु करण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी या गोष्टींची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना पीएम किसानची रक्कम मिळण्यात अडचणी येणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT