PM Kisan Samman Nidhi  google
बिझनेस

PM Kisan Samman Nidhi: PM किसान योजनेत बाप-लेक दोघांनाही मिळू शकतात 2000 रुपये? जाणून घ्या नियम...

kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेत एका कुटुंबातील किती सदस्यांना लाभ मिळतो? वडील आणि मुलगा दोघे पात्र ठरू शकतात का? जाणून घ्या सरकारी नियम आणि २३व्या हप्त्याबाबतची माहिती.

Sakshi Sunil Jadhav

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. पण अनेकांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न कायम असतो. तो म्हणजे, एका कुटुंबातील वडील आणि मुलाला दोघांनाही या पी PM Kisan Samman Nidhi योजनेचा लाभ घेता येतो का? याचे सरकारी नियम जाणून घेऊयात.

सरकारचे नियम काय?

सरकारी नियमांनुसार पीएम किसान योजनेचा लाभ हा एका कुटुंबातल्या फक्त एकाच पात्र शेतकऱ्याला दिला जातो. या योजनेत कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अप्लवयीन मुलं असा विचार केला जातो. त्यामुळे सामान्य परिस्थितीत एका घरातील प्रत्येक सदस्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही.

विशेष शेतकऱ्यांसाठी नियम

काही महत्वाच्या अटींमध्ये वडील आणि प्रौढ मुलगा या दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामध्ये जर वडील आणि मुलाच्या नावावर स्वतंत्रपणे शेतीची जमीन सरकारी महसूल नोंदीत नोंदवलेली असेल, तर दोघेही पात्र ठरतात. पण यासाठी मुलगा पौढ असणं गरजेचं आहे. पण जमीन फक्त वडिलांच्या नावावर असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

पुढचा हप्ता कधी येणार?

पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. सरकारकडून दर चार महिन्यांनी हा हप्ता दिला जातो. तसेच २३ वा हप्ता हा जुलै २०२६ मध्ये येण्याची शक्यता आहे. पण याबाबत सरकारने आत्तापर्यंत अधिकृत घोषणा केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT