Kidney Stone Food: किडनी स्टोनची झंझट मिटवायचीय? तर आजपासून 'हे' 6 पदार्थ खाणं सुरू करा...

Sakshi Sunil Jadhav

किडनी स्टोन

किडनी स्टोन ही फक्त एकदाच होणारी समस्या नाही. अनेकांना १० वर्षांच्या आत पुन्हा या धोक्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे आहाराची योग्य काळजी घेणं खूप महत्वाचं आहे.

Kidney Stone Prevention

हे पदार्थ टाळा

पालक, बीट, ड्रायफ्रुट्स आणि चॉकलेटमध्ये ऑक्सलेटचं प्रमाण जास्त असतं. याने कॅल्शियमसोबत एकत्र होऊन किडनीमध्ये स्टोन तयार करू शकतं.

Kidney Stone Food

हे पदार्थ खा

काकडी, कलिंगड, द्राक्षं, फ्लॉवर आणि केळी ही फळं कमी ऑक्सलेट असलेलेली असतात. जी तुम्ही सेवन करू शकता.

Kidney Stone Food

मीठ खाणं टाळा

जास्त मीठ खाल्यावर लघवीत कॅल्शियमचं प्रमाण वाढतं आणि स्टोनचा धोका वाढतो. पॅकेज्ड स्नॅक्स, फास्ट फूड आणि कॅन सूप कमी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

Healthy Kidney Diet

सॉफ्ट ड्रिंक्स टाळा

शुगर फ्री कोल्ड ड्रिंक्स आणि कृत्रिम फ्लेवर्ड ज्यूस किडनीवर वाईट परिणाम होतो. तुम्ही त्याऐवजी भरपूर पाणी, लिंबूपाणी किंवा साखर नसलेलं स्पार्कलिंग वॉटर पिऊ शकता.

Foods For Kidney Stones

प्रोटीनसाठी हेल्दी ऑप्शन

मसूरची डाळ, हरभरे, राजमा आणि इतर कडधान्यं हे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. यामुळे किडनीवर जास्त ताण येण्याचा धोका टळतो.

Foods For Kidney Stones

एनर्जी ड्रिंक्समुळे डिहायड्रेशन

कोला आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन जास्त असतं. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि स्टोन होण्याची शक्यता वाढते.

Foods For Kidney Stones

डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

दररोज पुरेसं पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि जास्त मीठ, साखर व प्रोसेस्ड फूड टाळा. योग्य जीवनशैलीमुळे किडनी स्टोनचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

Foods For Kidney Stones

NEXT: तोंडातल्या छोट्या फोडामुळे तरुणीला झाला Mouth Cancer, लगेचच वाचा महत्वाची माहिती

Tongue Cancer Symptoms
येथे क्लिक करा