Sakshi Sunil Jadhav
तरुणांमध्ये सध्या अनेक आजार वाढत चालले आहेत. जसं जास्त सर्दी-खोकला या समस्या जास्त दिवस असतील तेव्हा कोणताना कोणता आजार झालेला असतो. त्याचप्रमाणे तुमच्या तोंडातला फोड तुम्हाला गंभीर समस्यांना बळी पाडू शकतो.
दिल्लीतली 23 वर्षाच्या तरुणीच्या जिभेच्या कडेला छोटासा फोड आला होता. सुरुवातीला जीभ चावल्यामुळे जखम झाली असेल असं तिला वाटलं.
तरुणीला ही जखम साधी वाटली पण ती हळूहळू दुखायला लागली. बोलताना आणि जेवताना त्रास झाल्याचं तिने डॉक्टरांना सांगितलं.
वैद्यकीय तपासणीनंतर तरुणीला जिभेचा सुरुवातीच्या टप्प्यातील कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं. वेळेत निदान झाल्यामुळे उपचार शक्य झाले.
तरुणीला तंबाखू, सिगारेट किंवा कोणतेही व्यसन नव्हतं. त्यामुळे चुकीची जीवनशैली आणि असंतुलित आहार हे याचं कारण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
अभ्यासाच्या तणावामुळे ती बऱ्याचदा जेवण टाळत होती. तर तिच्या आहारात ताज्या भाज्या, वरण भाताऐवजी पॅकेज्ड फूड आणि शुगर फ्री ड्रिंक्स सेवन जास्त होतं.
डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून जिभेचा बाधित भाग पूर्णपणे काढून टाकला. विशेष म्हणजे तिची बोलण्याची क्षमता सुरक्षित ठेवण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर बोलण्याचा सराव, अन्न गिळण्याची थेरपी आणि योग्य आहार नियोजन करण्यात आलं.
तोंडातील फोड, जखम किंवा अल्सर बऱ्याच दिवसांपासून असेल आणि बरा होत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत तपासणी केल्याने कॅन्सरवर यशस्वी उपचार शक्य होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.