Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य यांच्या शिकवणी आजही जीवनात मार्गदर्शक मानल्या जातात. योग्य सवयी अंगीकारल्यास जीवनात यश आणि मानसिक समाधान मिळू शकते, असे चाणक्यांनी सांगितले आहे.
चाणक्यांच्या मते, जी लोकं इतरांच्या चांगल्या गुणांना ओळखू शकत नाहीत, ते नेहमी चांगल्या लोकांची निंदा करतात. अज्ञान व्यक्तीला मौल्यवान गोष्टींची किंमत कधीच समजत नाही.
जसा अज्ञानी व्यक्ती मौल्यवान मोती सोडून साधे बीज जपतो, तसाच मूर्ख माणूस चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निरर्थक गोष्टींना महत्त्व देतो.
चाणक्यांनी जेवण करताना शांत आणि संयमी राहण्याचा सल्ला दिला आहे. लक्षपूर्वक आणि मौन राहून जेवण केल्याने मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतात.
विद्यार्थ्यांनी काम, क्रोध, लोभ, अतिखाणे, शृंगार, जास्त झोप, मनोरंजन आणि अनावश्यक सेवा यापासून दूर राहीलं पाहिजे. यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित राहतं.
चाणक्यांच्या मते, शिस्त आणि वेळेचं नियोजन हे यशाचे महत्वाचं सूत्र आहे. विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिल्यास प्रगती सोपी होते.
जे लोक वरून गोड बोलतात पण मनात कपट ठेवतात, अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला चाणक्यांनी दिला आहे. असे लोक विश्वास ठेवण्यास योग्य नसतात.
दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करणारी व्यक्ती समाजात कधीच आदर मिळवू शकत नाही, असे चाणक्य सांगतात.
ज्या घरात प्रेम, आनंद, समजूतदार मुले, आदर करणारे सदस्य आणि सकारात्मक वातावरण असते, ते घर खऱ्या अर्थाने सुखी मानले जाते.