Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Saam Tv

चामखीळ आणि तीळ

बऱ्याच लोकांच्या मानेवर आपण अनेक चामखीळ आणि तीळ बघतो. घाम जास्त येत असेल तर मानेवर, शरीरावर चामखीळ आणि तीळ जास्त येतात.

Beauty Tips | PINTREST

चामखीळ आणि तीळाची समस्या

त्वचा घासल्यामुळे देखील चामखीळ आणि तीळाची समस्या वाढते. काही घरगुती उपाय करून तुम्ही हे चामखीळ आणि तीळ आठवड्याभरातच गायब करू शकता.

Beauty Tips | PINTREST

लसूण पेस्ट

लसणाची पेस्ट चामखीळ आणि तीळावर लावा. पेस्ट लावल्यावर कापडाने किंवा पट्टीने १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा. त्यामुळे चामखीळ आणि तीळ हळूहळू कमी होतील.

Beauty Tips | PINTREST

बेकिंग सोडा आणि एरंडेल तेल

बेकिंग सोडामध्ये एरंडेल तेल मिसळून चामखीळ आणि तीळांवर चांगली मालिश करा. या पेस्टचा मसाज केल्यानंतर १ तासाने स्वच्छ करा. याचा फरक महिन्याभरात जाणवेल.

Beauty Tips | PINTREST

केळीची साल

चामखीळ आणि तीळावर केळीची साल रात्रभर ठेवून द्या. त्यावर कापड किंवा पट्टी बांधा. सकाळी स्वच्छ धुवा. काही दिवसातच चामखीळ किंवा तीळ सुकून गळून पडेल.

Beauty Tips | PINTREST

अॅपल साईड व्हिनेगर

अॅपल साईड व्हिनेगरमुळे चामखीळ आणि तीळ कायमचा गायब होईल. अॅपल साईड व्हिनेगर चामखीळवर लावा. त्यावर कापसाचा बोळा ठेवा. असे केल्याने काही दिवसातच चामखीळ आणि तीळ कोरडा होईल आणि गळून पडेल.

Beauty Tips | PINTREST

कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांप्रमाणेच चामखीळासाठी देखील फायद्याचा आहे. दररोज चामखीळ आणि तीळावर कांद्याचा रस चोळून लावल्याने चामखीळ आणि तीळ कमी होतील.

Beauty Tips | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Beauty-Tips | PINTREST

Monsoon Healthcare Tips : पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका या 5 भाज्या, नाहीतर व्हावं लागेल अॅडमिट

Monsoon Healthcare Tips | META AI
येथे क्लिक करा