PM Internship Scheme Saam Tv
बिझनेस

PM Internship Scheme: खुशखबर! तरुणांना चांगल्या कंपनीत इंटर्नशिपची संधी; स्टायपेंडदेखील मिळणार; पीएम इंटर्नशिप योजना आहे तरी काय?

PM Internship Scheme Announcement: पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तरुणांना अनेक कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम इंटर्नशिप योजना. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. तरुणांना आता चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.

पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत देशभरात ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून अनेक तरुणांना या माध्यमातून नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तरुणांना करिअरमध्येही खूप फायदा होणार आहे.

पीएम इंटर्नशिप योजनेत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग आणि वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, ऑटोमोबाईल, औषधनिर्माण, उत्पादन, मीडिया, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप उपलब्ध आहेत. विविध विभागात काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतील तरुणांना ६ ते ९ महिन्यासाठी काम करावे लागणार आहे. या कालावधी ९००० रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे. याचसोबत इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याचा तुम्हाला भविष्यात करिअरमध्ये खूप फायदा होणार आहे.

पात्रता (PM Internship Scheme Eligibility)

पीएम इंटर्नशिप योजनेत १८ ते २५ वयोगटातील तरुण अर्ज करु शकतात. तरुण भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. किमान १०वी, १२वी पास, आयटीआय डिप्लोमा आणि पदवीधारक उमेदवार या इंटर्शिपसाठी अर्ज करु शकता. शिक्षण घेत असलेले उमेदवारदेखील या इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. जे उमेदवार ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत आहे तेदेखील अर्ज करु शकतात.

sया योजनेत इच्छुक उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. पुणे जिल्ह्यात विविध शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदे उपलब्ध असून इच्छुकांनी तातडीने अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT