EPFO Rule Saam Tv
बिझनेस

PF चे पैसे काढल्यानंतर पेन्शन मिळणार का? काय आहे नियम, वाचा सविस्तर

EPFO Rule For Pension And PF Withdrawal: प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. दर महिन्याला ठरावीक रक्कम पीएफ आणि पेन्शन खात्यात जमा केली जाते. जर पीएफ काढला तर पेन्शन मिळते का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

Siddhi Hande

प्रत्येक संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट हे असते. दर महिन्याला पीएफ अकाउंटमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही ठरावीक रक्कम जमा केली जाते. यातील अर्धी रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारातून तर अर्धी रक्कम नियोक्त्याकडून जमा केली जाते. यातील काही पैसे पीएफ अकाउंटमध्ये जमा केले जातात. तर काही रक्कम पेन्शनच्या स्वरुपात तुम्हाला मिळते. दरम्यान, अनेकदा पीएफची गरज भासते. त्यामुळे पीएफ काढल्यावर पेन्शन मिळते का? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

EPS म्हणजे काय? (What Is EPS)

EPS म्हणजे Employee Pension Scheme. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा केले जातात. हे पैसे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन स्वरुपात दिले जातात. हे पैसे तुम्ही काढू शकत नाही. फक्त काही ठरावीक कारणांसाठीच काढण्याची परवानगी असते.

PF म्हणजे काय? (What Is Provident Fund)

PF म्हणजे प्रोव्हिडंट फंड. कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा केले जातात. पीएफमधील गुंतवणूकीवर तुम्हाला सर्वाधिक व्याजदर मिळते. पीएफमधील पैसे तुम्ही कधी अडचणीच्या काळात काढू शकतात.

पीएफ काढल्यावर पेन्शन मिळते का? (Can we get pension after pf withdrawal)

पीएफ काढल्यावर पेन्शन मिळते की नाही हे तुम्ही किती वर्ष नोकरी करतात त्यावर अवलंबून असते. जर तुम्ही १० वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी नोकरी करत असाल तर तुम्ही पेन्शनची रक्कम काढू शकतात. यासाठी तुम्ही ईपीएफओच्या 10C चा वापर करावा लागतो.

जर तुम्ही १० वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी करत असाल तर तुम्ही पेन्शनचे पैसे काढूशकत नाही. हे पैसे पेन्शनच्या स्वरुपात जमा होतात. तुम्ही ५८ वर्षांचे झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला पेन्शनचे पैसे मिळतात. तुम्ही ईपीएफओचा फॉर्म 10D भरुन पेन्शन घेू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आमदार सचिन अहिर यांनी आमदार अमोल मिटकरींना दिला नवा चष्मा गिफ्ट

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT