Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ दिवसांत हे काम करा, नाहीतर पेन्शन विसरा

Pensioners Have To Submit Life Certificate: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पेन्शनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करायचे आहेत.
Pension Scheme
PensionSaam Tv
Published On

Government Employee Pension Scheme: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते. परंतु या कर्मचाऱ्यांनी जर अजूनही वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल, तर तुमची पेन्शन तुम्हाला मिळणार नाही. तुमच्याकडे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी फक्त ९ दिवस उरले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे काम करा.

केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. ८० वर्षांवरील पेन्शनधारकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात हे प्रमाणपत्र सादर करायचे होते. तर निवृ्त्तीवेतनधारकांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात प्रमाणपत्र सादर करायचे होते. त्यामुळे ज्यांनी कोणी प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांनी लवकरात लवकर सादर करावेत. (News For Pensioners)

Pension Scheme
Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

जीवन प्रमाणपत्र कोण सबमिट करणार? (Who Will Submit Life Certificate)

पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांची हयातीचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. जेणेकरुन तुम्हाला कोणत्याही अडचणींशिवाय दर महिन्याला पेन्शन मिळेल. जर तुम्ही अजूनही हे प्रमाणपत्र सादर केले नसेल तर लवकरात लवकर करावेत. जर तुम्ही हे जीवन प्रमाणपत्र नोव्हेंबर महिन्यात सादर केले नाही तर तुम्हाला डिसेंबर महिन्यात पेन्शन मिळण्यास अडथळे येऊ शकतात. आत फक्त तुमच्याकडे ८ दिवस बाकी आहेत. सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणजे ८० वर्षांवरील नागरिकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रमाणपत्र सादर करायचे होते. तर इतर पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्यात प्रमाणपत्र द्यायचे होते. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने प्रमाणपत्र सादर करता येते.

प्रमाणपत्र सादर न केल्यास काय होणार?

जर तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुम्हाला डिसेंबर महिन्यापासून पेन्शन मिळणार नाही.UIDAI नुसार, एकदा पेन्शन सिस्टीममध्ये जीवन प्रमाणपत्र अपलोड केल्यान तुम्हाला पुढील पेन्शन ही थकबाकीच्या रक्कमेसह दिली जाईल. परंतु जीवन प्रमाणपत्र हे तीन किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जमा केले जाणार नाही. याप्रमाणे जीवन प्रमाणपत्र सादर करा जीवन प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. तुम्ही हयात असून तुम्हाला ही पेन्शन मिळते, असं यातून दिसून येते.

Pension Scheme
Success Story: १६ व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमावली, १५-१५ तास सेल्फ स्टडी, पहिल्याच प्रयत्नात IAS झालेल्या सौम्या शर्मा यांची यशोगाथा वाचा

तुम्ही घरबसल्या जीवन प्रमाण पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने सादर करु शकतात. यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. त्याचसोबत तुम्ही पोस्टाद्वारे, उमंग अॅपद्वारे, पीडीएद्वारेदेखील प्रमाणपत्र सादर करु शकतात.

Pension Scheme
Success Story: वा रे पठ्ठ्या! ब्रेकअप के बाद थेट IAS; दोनदा अपयश आल्यानंतर UPSC क्रॅक, आदित्य पांडे यांची यशोगाथा वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com