कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ काढण्याबाबत एक मोठी अपडेट जाहीर केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFO कर्मचारी आता UPI द्वारे पैसे काढू शकणार आहेत. त्यांनी त्यांच्या पीएफ खात्यांमधून पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आणि मर्यादा सुद्धा स्पष्टपणे सांगितल्या आहेत. पुढे आपण एका वेळेला किती रक्कम काढू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.
ईपीएफओच्या सूत्रांनुसार, केंद्र सरकार आता यूपीआयच्या मदतीने EPF खात्यांमधून पैसे काढण्याची सुविधा देत आहे. या सुविधेचा फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ८ कोटींहून जास्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही कागदपत्रांच्या अडचणीशिवाय यूपीआय अॅपच्या साहाय्याने त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात सहजपणे ट्रान्सफर करता येतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओने स्पष्ट केले आहे की, PF खातं तुमच्या यूपीआयशी लिंक असले पाहिजे, बँक खाते आधीच आधार क्रमांकाशी लिंक केलेलं असलं पाहिजे. पीएफ खात्यात जमा केलेले पैसे नंतर यूपीआयच्या मदतीने लिंक केलेल्या बचत बँक खात्यात ट्रान्सफर केले पाहिजेत, त्यामुळे तुम्हाला हवे तेव्हा ते पैसे तुम्ही सहजपणे काढू शकता आणि डेबिट कार्ड किंवा बँक एटीएम वापरून खर्च करु शकता.
EPFO कर्मचाराऱ्यांना UPI वापरून त्यांचे PF निधी काढण्याची परवानगी देण्यासाठी एक अॅप लाँच केले जाणार आहे. या अॅप्लिकेशनच्या मदतीने UPI वापरून त्यांच्या बचत खात्यांमध्ये PF निधी ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध होईल. आता, EPFO सदस्यांना UPI वापरून त्यांचे पीएफ फंड काढण्याची सुविधा ही सुविधा पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मिळू शकते. यामुळे UPI तुमच्या पीएफ खात्याशी लिंक होताच पैसे ट्रान्सफर होतील.
पीएफ खात्यातून किती पैसे काढता येतात? या मुद्द्यावर अजून काही माहिती देण्यात आली नाही. नियमांनुसार, या नवीन सुविधेच्या मदतीने तुमच्या पीएफ खात्यातले ७५% रक्कम कोणत्याही कागदपत्रांशिवाय काढता येऊ शकतात. सध्या दिवसाला आणि महिन्याला एकूण किती रक्कम काढू शकतो याची मर्यादा समोर आलेली नाही. यावर चर्चा सुरु असलेल्याचे कळाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.